महाराष्ट्र

अडाणी शेतकऱ्यांचा लढा यशस्वी 

सकाळवृत्तसेवा

नाशिक  - निरक्षरतेचा गैरफायदा घेत आंबेगावच्या (ता. पेठ) पोस्टमास्टरने चुकीच्या नोंदी करत नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारला. पैशासाठी पीडितांनी टपालाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली; पण हाती काही आले नाही. कष्टाचे पैसे पुन्हा मिळविण्याची आशा त्यांनी सोडून दिली होती; मात्र जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे हुशारीने पीडितांची बाजू मांडत फसवणूक झालेली पाच लाखांची रक्‍कम व एक लाख ८६ हजार रुपयांची नुकसानभरपाई वकील कोमल गुप्ता यांनी मिळवून दिली. २०१४-१५ मध्ये घडलेल्या या प्रकरणात आंबेगाव (ता. पेठ) येथे कार्यरत पोस्टमास्तर के. एम. पवार यांनी याबाबत न्यायमंचाकडे लेखी स्वरूपात कबुली दिली. 

आंबेगाव पोस्ट कार्यालयात येणाऱ्या शेतमजूर, कामगारांच्या अज्ञानाचा फायदा उचलत भरलेल्या रकमेपेक्षा कमीच्या नोंदी करणे, एकाच खाते क्रमांकाचे तीन पासबुक बनविणे, असे विविध प्रकार सर्रासपणे सुरू होते. लेखी नोंदी असल्याने ही बाब वरिष्ठ पातळीवर लक्षातही येत नव्हती. आपली फसवणूक होत असल्याचे साधारणत: वीस-एकवीस ग्राहकांना लक्षात आले. त्यांनी औरंगाबाद डाकघर व नाशिक डाकघर येथील अध्यक्षांकडे दाद मागितली. टपाल खात्यातील तक्रार निरीक्षकाकडेही याबाबत विचारणा करत न्याय मिळवून देण्यासाठी साकडे घातले; परंतु त्यांच्या हाती निराशा आली. 

पीडितांचे हे प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून वकील कोमल गुप्ता यांच्याकडे आले. त्यांनी २०१७ मध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे खटला दाखल केला. हा संपूर्ण प्रकार ऐकून घेत अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी पीडितांच्या बाजूने निकाल दिला आहे. तक्रारदार वीस व्यक्‍तींपैकी अकरा व्यक्‍तींना प्रत्येकी दहा हजार रुपये नुकसानभरपाई व अर्ज खर्चापोटी दोन हजार, तर नऊ व्यक्‍तींना नुकसानभरपाईपोटी पाच हजार व अर्ज खर्चापोटी एक हजार रुपये अशी एक लाख ८६ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश न्यायमंचाने दिला. याशिवाय फसवणुकीच्या काळात डल्ला मारलेली सुमारे पाच लाख रुपये इतकी रक्‍कम संबंधितांच्या खात्यावर पुन्हा जमा करण्याचाही आदेश दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT