Thackrey in Nashik Esakal
महाराष्ट्र बातम्या

Thackeray in Nashik: 'शिवसेना नसती तर... काल अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा होऊ शकली नसती', ठाकरे गटाच्या खासदाराचं मोठं वक्तव्य

Uddhav Thackeray Nashik Visit : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आज नाशिकमध्ये राज्यव्यापी महाधिवेशन पार पडत आहे.या अधिवेशनासाठी ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी खासदार संजय राऊत बोलत आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन आज (मंगळवारी ता. २३) नाशिकमध्ये पार पडत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या अधिवेशनाला अनेकार्थाने महत्त्व प्राप्त झाले आहे. या अधिवेशनासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, रवींद्र मिर्लेकर यांच्यासह नेते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. याशिवाय शिवसेनेचे खासदार, आमदारांसह नेते, उपनेतेही या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. या अधिवेशनामध्ये बोलताना खासदार संजय राऊत यांनी "शिवसेना नसती, तर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती", असं म्हटलं आहे.

'संपूर्ण देशातील वातावरण राममय झालं आहे. त्यात उध्दव ठाकरे यांनी ज्योत पेटवली आहे. श्रीरामासोबत शिवसेनेचं जुनं नातं आहे, शिवसेना नसती, तर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती', असंही त्यांनी या अधिवेशनात बोलताना म्हटलं आहे.

"शिवसेना नसती तर अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झालीच नसती. शिवसेनेचे वाघ तिकडे पोहोचले. म्हणून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिकडे जाऊन प्राण प्रतिष्ठापना करता आली. म्हणून शिवसेनेच रामाशी जुनं नातं आहे. लोक म्हणतात, रामाशी आमचं नातं नाही. समर्थ रामदासांनी सांगितलं आहे, ते शिवसेनेच्या बाबतीत सांगितले आहे, आम्ही काय कुणाचे खातो, तो श्री राम आम्हाला देतो.तो आमचा राम बाळासाहेब ठाकरे असेल, आमचा राम काळाराम असेल आमचा राम अयोध्येचा राम असेल", असंही ते पुढे म्हणालेत.

"जिथे हे अधिवेशन होत आहे ते धर्मक्षेत्र आहे. कुरुक्षेत्र आहे, कारण इथून आपण लढाई सुरू केली होती. हे धर्मक्षेत्र आहे….लढाई आपण कुरुक्षेत्रातून सुरू करणार आहोत, जो राम अयोध्येत आहे तोच राम पंचवटीत आहे, प्रभू श्री रामाच्या जीनवात सर्वात मोठा संघर्ष जिथे झाला असेल तर तो या पंचवटीत या नाशिकमध्ये झाला आहे", असं संजय राऊत यांनी या अधिवेशनात म्हणाले आहेत.

"प्रभू रामाचा आयुष्यातला सर्वात मोठा संघर्ष नाशिकमध्ये झाला आहे. म्हणूनच उद्धवजींनी या पुण्यभूमीची, युद्धभूमीची निवड केली आहे". "श्रीरामाचं आणि शिवसेनेचं नातं आहे. रामाचे धैर्य म्हणजे शिवसेनेचं धैर्य, रामाचं शौर्य ते शिवसेनेचं शौर्य आहे. रामाचा संयम तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे. म्हणून रामाचं आणि आपलं नातं आहे" असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indra Nooyi India Remarks : भारत घाण देश, तिथे असते तर पेप्सिकोची सीईओ कधीच झाले नसते... इंद्रा नूयी यांनी गायले चीनचे गोडवे

Kolhapur News : आबाजीच गोकुळचे ‘बाप’, अरुण डोंगळेंच्या विधानाने नव्या वादाला तोंड; दूध उत्पादक सभासदांना कमी लेखण्याचा प्रकार

Croatia vs Portugal : ख्रिस्तियानो रोनाल्डो स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार की स्वप्नांचा चुराडा होणार? दोन दिग्गजांची कसोटी

Shadu Idols : शाडूच्या मूर्तीबाबत अडचण काय? POP वर सरसकट बंदी नको, राज्य सरकारचा विरोध; शाडूच्या मूर्तीला अडचण काय? हायकोर्टाची विचारणा

Navi Mumbai News : नवी मुंबईत गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरी गंभीर; चौकशी समिती नियुक्त

SCROLL FOR NEXT