Onion Export  esakal
महाराष्ट्र बातम्या

Onion Export News : गुजरातचा पांढरा कांदा निर्यातीस परवानगी; लाल कांद्याची अडवणूक कायम

Onion Export : महाराष्ट्रातील लाल कांद्याला निर्यातबंदी असताना गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची निर्यात केंद्र सरकारने खुली केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Onion Export News : महाराष्ट्रातील लाल कांद्याला निर्यातबंदी असताना गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची निर्यात केंद्र सरकारने खुली केली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने गुजरातच्या दोन हजार टन कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबाबत दुजाभाव केल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. महाराष्ट्रात लेट खरीप कांद्याचा हंगाम वेगात असताना ८ डिसेंबरपासून केंद्र सरकारने निर्यातबंदी केली. ( White onion export from Gujarat allowed )

त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत विदेश व्यापार महासंचालनालयाचे महासंचालक संतोषकुमार सारंगी यांनी शुक्रवारी (ता. २५) जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार दोन टन कांद्याची निर्यात केली जाईल. त्यासाठी गुजरातमधील मुंद्रा, पिपावाव व नाव्हाशेवा म्हणजेच जेएनपीटी बंदरातून ही निर्यात करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यात निर्यातदाराला गुजरात सरकारच्या फलोत्पादन आयुक्तांचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. निर्यातदाराला पांढरा कांदा निर्यात करण्याचे स्वरूप व प्रमाण याची माहिती द्यावी लागेल. या निर्णयामुळे गुजरातचा कांदा विदेशात पोहोचेल आणि महाराष्ट्राचा कांदा चाळींमध्येच सडेल, अशी उद्विग्न भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.(latest marathi news)

निर्यातीचा घाट का?

खरीप हंगामातील लाल कांद्याच्या विक्रीला गती येत असतानाच केंद्र सरकारने निर्यातबंदी केली. शेतकऱ्यांना हजारो कोटींचा फटका बसला आहे. त्यातच आता रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याची काढणी सुरू होऊन कांदा बाजारात येत असताना एकीकडे कांदा कवडीमोल दराने विक्री होत आहे; तर पांढऱ्या कांद्याला अधिक दर असतानाही त्याच्या निर्यातीस परवानगी दिली. मात्र, लाल व गुलाबी कांद्याला निर्यातीची परवानगी का नाही? असा प्रश्‍न निर्यातदारांनी उपस्थित केला आहे.

उमेदवारांना कांदा रडडिणार

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी येत्या २० मेस मतदान होत आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांदा उत्पादन होते. त्यामुळे कांद्याच्या दराचा मुद्दा अगोदरच लोकसभा निवडणुकीत गाजत असताना आता गुजरातच्या कांद्याची निर्यात खुली झाल्याने उमेदवारांच्या अडचणीत भर पडली. ऐन निवडणुकीच्या काळात निर्यातीचा निर्णय झाल्याने दिंडोरी, नाशिक व धुळे लोकसभेतील सत्ताधारी उमेदवारांना हा कांदा रडविणार तर नाही, अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होऊ लागली आहे.

''गुजरातमधील सफेद कांदे ‘एनसीईएल’ऐवजी खुल्या पद्धतीने एक्स्पोर्ट होणार आहे. त्यासाठी गुजरात सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. गुजरात सरकारची परवानगी घेतल्यावर निर्यात करता येईल. फक्त गुजरातचा पांढरा कांदा निर्यात होणार असल्याने ही बाब महाराष्ट्रासाठी अन्यायकारक आहे.''- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT