nashik safar.jpg
nashik safar.jpg 
महाराष्ट्र

फक्त धड्यात वाचले होते...आता प्रत्यक्षात पाहता आले

सकाळ वृत्तसेवा


नाशिक :  ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थी आणि आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांच्या संस्कृतींचे आदान-प्रदानाचा कार्यक्रम झाला.आशाकिरणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी नाशिकमध्ये एक दिवस शैक्षणीक आणि सांस्कृतीक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये या विद्यार्थ्यांनी विल्होळी येथील जैन मंदिराला भेट दिली. त्याचप्रमाणे त्यांनी शहरातील रस्ते वाहतुक, सिग्नल्स, उड्डाण पुल याबाबत फक्त पुस्तकातील धड्यामध्येच वाचलेले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांना आज पाहता देखील आले. या सहलीत सहभागी झालेले आशाकिरणवाडी आदिवासी शाळेचे मुख्याध्यापक अरुण भामरे यांनी सांगितले की, या विद्यार्थ्यांनी कधीच इगतपुरीच्या बाहेर कधी पाउल ठेवले नाही ते आज पहिल्यांदा त्यांचे गाव सोडुन शहरात पहिले पाऊल ठेवले आहे. 

आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांना घडवली नाशिक सफर 

रोटरी क्‍लब नाशिक वेस्ट यांच्यातर्फे यशवंतराव चव्हाण तारांगण आणि सायन्स सेंटरमध्ये एक तासांचा अवकाश आणि अवकाशातील ताऱ्यांचा विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी सुर्यमाला, चांदण्या, तारे, चंद्र, ग्रह, उपग्रह, सप्तर्षी, आकाशगंगा, कृष्णविवर, धुमकेतु अशा आश्‍चर्यचकित करुन सोडणाऱ्या गोष्टी पहायला मिळाल्या. मिच्च काळ्यारात्री अवकाशात दिसणाऱ्या तारे आणि चांदण्याची गम्मत तारांगणात अनुभवतांना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद व्दिगुणीत झाला होता. त्यानंतर जीव्हीआयएसमध्ये आल्यानंतर द रेन हॉटेल यांच्या सहकार्याने भोजन देण्यात आले होते. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गीतमंचच्या विद्यार्थ्यांनी गणेशवंदना, लींगोबाचा डोंगर आभाळी गेला हे ठाकर गीत सादर केले. तर नृत्य साधना डान्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी गणेशवंदना सादर केली. 

धड्यामध्येच वाचले होते...परंतु प्रत्यक्षात पाहता आले

आशाकिरणवाडीहुन विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी बस व्यवस्था तसेच व विद्यार्थ्यांना टी-शर्ट व चप्पल त्यांनी दिले. या उपक्रमासाठी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, रोटरी क्‍लब नाशिक वेस्टचे सीमा पाच्चड, महावीर एज्युकेशनचे हरीष संघवी, शितल संघवी, मंजु सारसांबी, अवकाश अभ्यासक अपुर्वा जाखडी यांचेही सहकार्य लाभले. यावेळी संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर, द रेन हॉटेलचे मुख्य व्यवस्थापक अलोक कुमार उपस्थित होते. यावेळी शाळेचे सर्व समन्वयक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT