sameer wankhede and nawab malik sakal
महाराष्ट्र बातम्या

मलिकांना झटका! राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा वानखेडेंना दिलासा

आयोगानं समीर वानखेडे यांना अनुसूचित जाती जमातीचं संरक्षण दिलं आहे.

सुधीर काकडे

एनसीबीचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून (National Commission for Backward Classes) दिलासा मिळाला असून, नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जातोय. वानखेडेंच्या चौकशीसाठी तयार करण्यात येणारं विशेष तपास पथक रद्द करण्याचे आदेश आयोगानं दिले आहे. राज्याचे मुख्यसचिव देवाशिष चक्रवर्ती, पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासह काही वरीष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा वानखेडेंना दिलासा, मलिकांना झटका!

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे समीर वानखेडे अडचणीत सापडले होते. त्यानंतर समीर वानखेडेंनी याप्रकरणी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे धाव घेतली होती. काल या प्रकरणावर सुनावणी पार पडली. या सुनावणीच्या ऑर्डरच्या कॉपी आता समोर आल्या असून, या ऑर्डरमध्ये समीर वानखेडेंविरोधात एससी आणि एसटी कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात येऊ शकत नाही, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. समीर वानखेडेंच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारकडून नेमण्यात आलेली समिती रद्द करण्यात यावी, असंही आदेशात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT