nitin gadakari  esakal
महाराष्ट्र बातम्या

'महामार्गाच्या कामात 3000 कोटींचा स्पीडब्रेकर'

स्नेहल कदम

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्य सरकारशी काही महिन्यांपूर्वी संपर्क साधला आहे.

मुंबई - राज्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये लोकप्रतिनिधी अडथळा आणत असल्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पत्र लिहले होते. या पत्रावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. हा किस्सा ताजा असतानाच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विकासामध्ये अडथळा ठरणाऱ्या आणखी एका मुद्द्यानं डोकं वर काढलं आहे. यासंदर्भात रस्ते वाहतूक मंत्रालयाचे संचालक राजेश गुप्ता यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (national highways authority) अध्यक्षांना पत्र लिहले आहे. हे पत्रही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

महामार्गांच्या कामात तीन हजार कोटींचा स्पीड ब्रेकर लागला आहे. याबदली भरमसाठ मोबदला दिला जात असल्यानं पुढं काम करणं शक्य होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. जमीन अधिग्रहणामध्ये अपील करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना महसूल अधिकारी कृषी जमिनीच्या किंमतीपेक्षा 7 ते 27 पट अधिक मोबदला देत असल्याचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्य सरकारशी काही महिन्यांपूर्वी संपर्क साधला आहे. राज्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. या पत्रातून राज्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर रोष जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार (thackeray government) आता कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT