National Human Rights Commission 
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल; 4 आठवड्यात मागितले उत्तर

Sandip Kapde

National Human Rights Commission: नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. आयोगाने राज्य सरकार आणि मुख्य सचिवांना नोटीस  पाठवली आहे. आयोगाची दोन सदस्सीय टीम महाराष्ट्रात येऊन पाहणी करणार आहे.

रुग्णालयांना भेटी देण्यासाठी, कारणे शोधण्यासाठी आणि उपाय सुचवण्यासाठी आयोगाने आपल्या विशेष प्रतिनिधीची नियुक्ती केली आहे.

नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यांतील दोन सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय मदतीचा अभाव आणि अत्यावश्यक औषधांच्या कमतरतेमुळे या रुग्णालयांमध्ये रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.

माध्यमातील अहवालातील मजकूर सत्य असल्यास, सार्वजनिक प्राधिकरणांच्या निष्काळजीपणामुळे पीडितांच्या जीवन आणि आरोग्याशी संबंधित मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. ही चिंतेची बाब आहे, असे निरीक्षण आयोगाने नोंदवले आहे.

त्यानुसार, महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून चार आठवड्यांत या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. त्यामध्ये पायाभूत सुविधांची स्थिती तसेच सरकारी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांचे आवश्यक आणि सध्याचे संख्याबळ तसेच रुग्णांसाठी उपलब्ध औषधे आणि निदान सुविधांची स्थिती यांचा समावेश असावा, असे आयोगाने म्हटले आहे. (Latest Marathi News)


आयोगाने राज्य सरकारला त्यांच्या मुख्य सचिवांमार्फत जबाबदार लोकसेवकांवर केलेल्या कारवाईची तसेच पीडित कुटुंबांना पुरविण्यात आलेल्या मदत आणि पुनर्वसनाची स्थिती याबद्दल माहिती देण्यास सांगितले आहे. भविष्यात अशा दुर्दैवी मृत्यूची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करण्यासाठी राज्य सरकारने उचललेल्या किंवा प्रस्तावित केलेल्या पावलांचीही आयोगाला माहिती हवी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT