Winners of National School Kho-Kho Championship Boys and Girls Team of Maharashtra. Dignitaries, coaches, volunteers present at the prize distribution ceremony.  esakal
महाराष्ट्र बातम्या

National School Kho Kho Tournament: खो-खो स्‍पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद; गुजरात उपविजेता

सकाळ वृत्तसेवा

National School Kho Kho Tournament : पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथे खेळविण्यात आलेल्‍या १७ वर्षाआतील ६७ व्‍या राष्ट्रीय शालेय खो- खो स्‍पर्धेत महाराष्ट्र संघाने लक्षवेधी कामगिरी केली.

मुले व मुली अशा दोन्‍ही संघांमध्ये महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावीत दुहेरी मुकुट प्राप्त केला. तर अंतिम फेरीत पराभूत गुजरातचा संघ दोन्‍ही संघात उपविजेता ठरला. (National School Kho Kho Tournament win by Maharashtra news)

सुषमा चौधरी, कृष्णा बनसोड यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला. तर अमृता पाटील, अवनी वंश उत्कृष्ट खेळाडू ठरले.

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक आणि क्रीडा उपसंचालक नाशिक विभाग यांच्यातर्फे राष्ट्रीय शालेय खो- खो स्‍पर्धा पार पडली. गुरुवारी (ता. ७) स्पर्धेत खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या मुले आणि मुलींच्या संघानी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने गुजरातचा १३-१२ असा पराभव केला. मुलीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करून गुजरातला १३-०६ असे सात गुण आणि एक डाव राखून पराभूत करून दुहेरी मुकुट महाराष्ट्राच्या नावे कोरले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला ऑलिंपिकपटू दत्तू भोकनळ, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त नरेंद्र छाजेड, स्कूल गेम्स फेडरेशनचे खजिनदार भीष्मय व्यास, प्राचार्य पी. व्ही रसाळ, प्राचार्य सचिन माळी यांची उपस्‍थिती होती. विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक, पदक आणि प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आले.

वैयक्‍तिक कामगिरीवर खेळाडू सन्‍मानित

स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू सुषमा चौधरी आणि कृष्णा बनसोडे (दोघीही महाराष्ट्र) यांना गौरवण्यात आले. तर उत्कृष्ट आक्रमक म्हणून अजय भवभोर (गुजरात) आणि अमृता पाटील (महाराष्ट्र). उत्कृष्ट बचावपटू म्हणून अवनी वंश (गुजराथ) आणि भावेश म्हासदे यांनाही आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.

स्‍पर्धेतील निकाल असा-

मुले : विजेता- महाराष्ट्र, उपविजेता- गुजरात, तृतीय- केरळ, चौथा- उत्तर प्रदेश.

मुली : विजेता- महाराष्ट्र, उपविजेता- गुजरात, तृतीय- पंजाब, चौथा- ओरिसा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News:मुंबई मेट्रो-3: दिव्यांग प्रवाशांना करावा लागतोय त्रासाचा सामना

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT