National Water Awards 
महाराष्ट्र बातम्या

National Water Awards: राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी नामांकन पाठवण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

National Water Awards: केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून यंदा जलसंवर्धन व व्यवस्थापनाशी संबंधित नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा ते ग्रामपंचायत पातळीपर्यंत विविध संस्थांना व वैयक्तिक पुरस्कार देण्यात येतात.

त्यासाठी नामांकनाचे आवाहन करण्यात आले आहे. (National Water Awards appeal to send nomination nashik news)

नामांकन हे प्रामुख्याने जलसंवर्धन व व्यवस्थापन संबंधित नावीन्यपूर्ण काम करणारे उत्कृष्ट राज्य, उत्कृष्ट जिल्हा, उत्कृष्ट ग्रामपंचायत, उत्कृष्ट शाळा व महाविद्यालय, उत्कृष्ट संस्था (शाळा व महाविद्यालय वगळून), उत्कृष्ट समाज संस्था, उत्कृष्ट पाणीवापर संस्था व उत्कृष्ट काम करणारी व्यक्ती यांनी भरावे.

राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (www.awards.gov.in ) ३१ डिसेंबर नामांकन भरायचे आहेत. नामांकनासाठी गत एक वर्ष कालावधीत जलसंवर्धन व व्यवस्थापन संबंधित काम केलेल्या संस्था व व्यक्ती या पात्र असणार आहेत.

जिल्ह्यात जलसंवर्धन व व्यवस्थापनाचे उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालये, समाजसंस्था किंवा उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींनी नामांकन भरावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

जिल्ह्यातून नामांकन भरलेल्या संस्था/ व्यक्ती यांनी आपली संक्षिप्त माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या nbazpnashik1@gmail.com या मेलवर ३१ डिसेंबर २०२३ अखेर सादर करावी, असे आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक व उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT