Sharad Pawar news esakal
महाराष्ट्र बातम्या

Election Commission : राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द; 'या' कारणांमुळे आयोगाने केली कारवाई

संतोष कानडे

नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.

निवडणूक आयोगाचा हा पक्षाला मोठा धक्का आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे हा पक्ष केवळ प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे. किमान चार राज्यांमध्ये पक्षाचे अस्तित्व असणे गरजेचे आहे. या सगळ्या नियमांमधून राष्ट्रवादी अपात्र ठरला आहे. केवळ राष्ट्रवादी पक्षच नाही तर आणखी काही पक्षांवर देखील ही कारवाई केली आहे.

10 जानेवारी २००० ला राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. २०१४ पर्यंत दर्जा कायम होता. परंतु त्यानंतर पक्षाला आयोगाने नोटिसा पाठवल्या.

इतर राज्यांमधले अस्तित्व कमी झाल्याने निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. इतर राज्यातला प्रादेशिक पक्षांचा दर्जा कमी झाला आहे. निवडणूक आयोगाने काढलेली ऑर्डर १८ पानांची आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत १६ टक्के मतं मिळाली होती. २८८ पैकी ५४ जागा जिंकल्या होत्या. या सगळ्या बाबींचा निवडणूक आयोगाने विचार करुन त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी याबाबतची घोषणा केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रस पक्ष आता प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी यासंबधी प्रतिक्रिया दिली आहे. जो निर्णय आला आहे त्याच्याविषयी अधिकृत माहिती आलेली नाही. आम्ही ज्येष्ठ विधिज्ञांकडून सल्ला घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे'; राज ठाकरेंची टीका

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT