Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : ''...तर शरद पवारांना मी वाकून नमस्कार करेन'', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

पिंपरी चिंचवडमध्ये शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या संमेलनामध्ये रविवारच्या एका सत्रामध्ये राज ठाकरेंची प्रकट मुलाखत झाली.

संतोष कानडे

पिंपरी चिंचवडः पिंपरी चिंचवडमध्ये शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या संमेलनामध्ये रविवारच्या एका सत्रामध्ये राज ठाकरेंच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं.

''आता जर शरद पवार व्यासपीठावर आले तर मी वाकून त्यांना नमस्कार करेन. व्यासपीठावर बोलले जाणारे राजकीय विषय वेगळे असतात आणि एखाद्याच्या अनुभवाचा, वयाचा मान ठेवणं वेगळं असतं'' असं राज ठाकरे म्हणाले.

मराठी कलाकारांच्या मान-सन्मानावरुन बोलताना राज ठाकरे म्हणाले, एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचा सन्मान केला पाहिजे. कोणाचं वय किती आहे, त्याचा अनुभव किती आहे.. यावरुन त्याचा मान ठेवला पाहिजे.

''तुम्ही चार भितींमध्ये एकमेकांना काहीही बोला. परंतु चारचौघांमध्ये एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. सर म्हटलं पाहिजे किंवा पूर्ण नावाने एकमेकांना बोलले पाहिजे. नाट्य संमेलनाच्या निमित्ताने असा निश्चय करा.'' असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.

काय म्हणाले राज ठाकरे?

  • अरुण सरनाईक यांना अरु नावाने कुणी हाक मारल्याचं कधी ऐकलं नाही किंवा श्रीराम लागूंना शिरु नावाने कुणी कधी बोललं नाही. श्रीराम सर किंवा साहेब असंच म्हटलं गेलं.

  • सर्व मराठी कलाकारांना विनंती आहे की, एकमेकांना मान द्या. एकमेकांना सर म्हटलं पाहिजे.

  • अशोक सराफांना मामा का म्हणता? चार भिंतीमध्ये काय बोलायचं ते बोला.. परंतु जाहीरपणे मामा म्हणू नका. ते तुमचे सख्खे मामा आहेत का?

  • शंभराव्या नाट्य संमेलनात शपथ घ्यायला पाहिजे की सर्वांना मान देत राहू आणि मान घेत राहू. हिंदी कलाकार आणि दाक्षिणात्य कलाकार एकमेकांना सर म्हणून आवाज देतात.

  • राजकारणातही एकमेकांना मान दिला पाहिजे. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. ते जर इथे आले तर मी त्यांना वाकून नमस्कार करेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT