Sudhir Mungantiwar Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sudhir Mungantiwar : 'अजितदादा अर्थमंत्री असले तरी त्यांच्याकडील कागदाच्या नोटा आमच्याच जंगलात तयार होतात'

छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढताना वापरलेली वाघनखे भारतात लवकरच येणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

वनमंत्री असताना महाराष्ट्राचा साग आणि वाघ विविध माध्यमांतून जगभर नेला. इतकेच नव्हे तर बहुचर्चित अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य दरवाजाचे लाकूडही आपण दिल्याचं त्यांनी सांगितलं.

सांगली : छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढताना वापरलेली वाघनखे भारतात लवकरच येणार आहेत. तमाम भारतीयांसाठी ती प्रेरणादायी गोष्ट ठरेल, असं स्पष्ट मत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केलं.

100 व्या नाट्यसंमेलनाचे (Natya Sammelan) नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल (Dr. Jabbar Patel) यावेळी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची (Akhil Bharatiya Natya Parishad) मुहूर्तमेढ नाट्यपंढरी येथील विष्णुदास भावे नाट्यविद्यामंदिरात रोवण्यात आली. या सोहळ्यात ते बोलत होते.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, वनमंत्री असताना महाराष्ट्राचा साग आणि वाघ विविध माध्यमांतून जगभर नेला. इतकेच नव्हे तर बहुचर्चित अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य दरवाजाचे लाकूडही आपण दिल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार (Ajit Pawar) अर्थमंत्री असले तरी त्यांच्याकडे कागदाच्या नोटा आमच्या जंगलातील लाकडापासूनच तयार होतात, मग तिकडे जातात, असंही ते म्हणाले.

विमानाचे उड्डाण वेळाने झाल्याने कार्यक्रमाला विलंब झाल्याचे सांगत प्रशांत दामले यांनी मुनगंटीवार पहाटे चारपासून सांगलीला येण्यासाठी तयार होते. विमानात त्यांनी दहा-दहा मिनिटांच्या डुलक्या काढल्या. अशा डुलक्या काढल्यास 24 तासही कार्यरत राहण्याचा विश्वास मुनगंटीवार यांना असल्याचे दामले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT