महाराष्ट्र बातम्या

Shardiya Navratri 2022: राज्यभर नवरात्रोत्सव उत्साहात; देवीच्या मंदिरात गर्दी

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर नवरात्रोत्सवामुळे राज्यासह देशभरात चैतन्याचे वातावरण आहे

सकाळ डिजिटल टीम

शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या आदिशक्तीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत असलेल्या नवरात्रोत्सवाने राज्यासह देशभरात चैतन्याचे वातावरण आहे. नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील शक्तीपीठं गजबजली आहेत. साडेतीन शक्तीपीठं असलेल्या देवस्थानांमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि नाशिकच्या वणीची सप्तश्रुंगी देवीचं मंदिर नवरात्रोत्सवानिमित्त सजली आहेत.

दोन वर्षांनंतर हा शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. याच दरम्यान देवीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. या काळात काही अघटित घडू नये यासाठी मंदिर प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यात गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सणोत्सवांवर बंधने आली होती. मात्र यंदा दोन वर्षानंतर सर्व निर्बंध हटवण्यात आल्यामुळे, सर्वच उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत आहेत. नवरात्रोत्सव निमित्ताने पुढील दहा दिवस आदिशक्तीचा जागर पहायला मिळणार आहे. राज्यात नवरात्रोत्सवाची जय्यात तयारी केली असून, यंदा कोल्हापूर, तुळजापूरमध्ये रेकॉर्ड ब्रेक भाविकांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने देखील जय्यत तयारी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT