Kalamboli Accident ESakal
महाराष्ट्र बातम्या

Kalamboli Accident: तेलाचा कंटेनर पलटी झाल्याने अपघात, दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणीसोबत अनर्थ, घटनेनं हळहळ

Navi Mumbai Accident: कळंबोलीत तेलाचा कंटेनर पलटी झाल्याने तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी मुंबई: राज्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. असाच एक अपघात नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये घडला आहे. या घटनेत एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कळंबोलीमध्ये तेलाचा कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. यानंतर टॅंकरमधील तेल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडले होते. याचेवळी या तेलावरून दुचाकी घसरली आणि तरुणीने नाहक जीव गमावल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव राजनंदिनी जाधव (19) असं आहे. नवी मुंबईतील कळंबोली सर्कल येथे एक तेलाचा टँकर पलटी झाला होता. त्यानंतर टॅंकरमधील तेल रस्त्यावर सांडले होते. तेवढ्यातच ही तरुणी दुचाकीवरून तेथून जात होती. रस्त्यावर सांडलेल्या तेलावरून तिची दुचाकी घसरली. या घटनेत तरुणीला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे राजनंदिनी जाधवचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दरम्यान पलटी झालेला टँकर बाजूला करण्याचे काम सुरू आहेत. त्यानंतर कळंबोळी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. त्यांनी फोमच्या सहाय्याने रस्ता धुतला. यामुळे रस्त्यावर सांडलेले तेल कमी झाले. मात्र या घटनेनं परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. तसेच वाहतूक हळूहळू सुरळीत करण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT