Navneet Rana Ravi Rana esakal
महाराष्ट्र बातम्या

Navneet - Ravi Rana : हनुमान चालिसा पठण प्रकरणात नवा ट्वीस्ट; सरकारी वकिलांना तडकाफडकी काढलं

त्यांच्याकडे असलेली भाजपा नेत्यांविरोधातली सगळी प्रकरणं काढून घेण्यात आली आहेत.

वैष्णवी कारंजकर

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची मागणी केल्यावरुन नवनीत आणि रवी राणा या दाम्पत्याविरोधात सध्या खटला सुरू आहे. यामध्ये आता एक मोठा ट्वीस्ट आला आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांची या केसमधून उचलबांगडी करण्यात आली आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात हनुमान चालिसा पठण वाद सुरू असताना सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे. यासाठी प्रदीप घरत यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता त्यांना या प्रकरणातून हटवण्यात आलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात घरत यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची प्रतिमा साफ असून त्यांनी अनेक गाजलेल्या खटल्यांना तडीस नेलं आहे. राज्यात शिंदे - फडणवीसांचं सरकार आल्यानंतर घरत यांच्याकडून अनेक महत्त्वाची प्रकरणं काढून घेण्यात आली आहे. विशेषतः भाजपा नेत्यांच्या विरोधातली प्रकरणं काढून घेण्यात आली आहे.

दरम्यान, राणा दांपत्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. राणा दांपत्याने दोषारोप मुक्तीचा अर्ज केला होता. मात्र त्यांच्यावर झालेले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे उपलब्ध असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT