Navneet Rana and Ravi Rana Sakal
महाराष्ट्र बातम्या

राणा आणि राऊत आमने-सामने; लेहच्या गारव्यात वादाची ठिणगी थंडावणार?

मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणावरून सध्या दोन्ही नेत्यांमध्ये वाक्-युद्ध सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

राणा दाम्पत्याच्या मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या हट्टामुळे शिवसैनिक त्यांच्यावर चांगलेच संतापले आहेत. शिवसेना आणि राणा दाम्पत्यातली ही ठिणगी अद्याप धुमसत आहे. अशातच आता संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) आणि राणा दाम्पत्य समोरासमोर येणार आहेत.

खासदार नवनीत राणा आणि संजय राऊत हे संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने लेहमध्ये आले आहेत. यावेळी शिवसेना आणि राणा दाम्पत्यांमधली ठिणगी थंड होणार का, अशा चर्चा सुरू आहेत. खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि संजय राऊत दोघेही या समितीचे सदस्य आहेत. महाराष्ट्रातून प्रकाश जावडेकरही या दौऱ्यासाठी जाणार आहेत.

मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणावरून सध्या दोन्ही नेत्यांमध्ये वाक्-युद्ध सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये काय चर्चा होणार, वादाची ठिणगी थंडावणार का? काही हलकेफुलके क्षण, दोन्ही नेत्यांमधल्या अनौपचारिक गप्पा राज्याला पाहायला मिळतील का? याकडे सध्या लक्ष लागून राहिलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT