Navneet Rana, Ravi Rana Marathi News | Uddhav Thackeray Sabha sakal
महाराष्ट्र बातम्या

'मुन्नाभाई'सारखे राज ठाकरे हिट होतील आणि तुम्ही...; नवनीत राणांचा टोला

मुख्यमंत्र्यांची कालची सभा ही लाचार सभा होती, अशी टीकाही राणा दाम्पत्याने केली आहे.

वैष्णवी कारंजकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या कालच्या सभेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाचा हट्ट करणाऱ्या राणा दाम्पत्याला जेलची हवा खावी लागली होती. तेव्हापासून त्यांनी ठाकरेंवर सुरू केलेलं टीकासत्र सुरूच आहे. कालच्या भाषणावरूनही खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा (MP Navneet Rana and her husband MLA Ravi Rana) यांनी टीका केली आहे.

खासदार नवनीत राणा म्हणाल्या, "मुख्यमंत्र्यांनी कालच्या सभेत शेतकरी, बेरोजगारी, लोडशेडिंगबद्दल काहीही उल्लेख केला नाही. फक्त दुसऱ्यांवर बोलण्यासाठी ती सभा होती. अडीच वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत. मुख्यमंत्री विदर्भ, मराठवाड्यात गेल्याचं त्यांच्या मुलाने सांगितलं. पण त्यांच्या दौऱ्याचा फक्त एक व्हिडीओ त्यांनी जाहीर करावा. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनंतर तिप्पट प्रमाणात राज्यात बेरोजगारी वाढलीये. औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांवर एक शब्द बोलला नाही. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करायचं तुम्हीच म्हणाला होता. पण व्यासपीठावर बोलताना त्याची काही गरज नाही म्हणालात. एक नाव बदलू शकत नाहीत, इतके लाचार मुख्यमंत्री आहेत. त्यांना माहित आहे की नाव बदललं तर बाकीचे पक्ष बाजूला होतील".

मुख्यमंत्र्यांनी हनुमानाचा अपमान केला!

"काल एका खासदाराने मुख्यमंत्र्यांच्या हातात गदा देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी त्याला हात न लावता ते मागे फिरले. गदा कोणी दिली तर त्याला हातात घेऊन त्यानंतर गदा दुसऱ्याकडे दिली जाते. पण मुख्यमंत्र्यांनी गदा हातात न घेऊन हनुमानाचा अपमान केलाय".

शिवसेना औरंगजेबाची सेना झाली आहे का?

"मला म्हणाले हनुमान चालिसा काश्मीरमध्ये जाऊन म्हणा. जर मी काश्मिरमध्ये हनुमान चालिसा पठण करू शकते तर महाराष्ट्रात का नाही? मी नवनीत राणा, रवी राणाच्या फायद्यासाठी हनुमान चालिसा म्हणणार नव्हते. तुम्ही पुरुष आहात, माझ्यापेक्षा महिलेपेक्षा जास्त शक्तिशाली आहेत. पण तुम्ही तुमच्या शक्तीचा गैरवापर केलात. हनुमान चालिसा म्हणण्याची मागणी करणाऱ्या महिलेला तुम्ही देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकता. पण औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. शिवसेना औरंगजेबाची सेना झाली आहे का?"

आजचे मुख्यमंत्री लाचार आहेत!

"बाळासाहेब असते तर ज्याने औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली, त्याला त्याच कबरीमध्ये गाडलं असतं, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. पण आजचे मुख्यमंत्री लाचार आहेत. त्या सभेत कोणाला उत्साह नव्हता. सभा मुंबई महापालिकेसाठी होती आणि सगळ्या राज्यातून लोक तिथं आले होते. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढायला हवी, याचं उत्तर त्यांनी का दिलं नाही? बाळासाहेब कधी लढले नाहीत, सत्तेवर बसले नाही, कायम शिवसेनेला वाढवत राहिले. इतिहासात पाहा, हनुमान चालिसा तोच वाचतो, ज्याला कोणालातरी संकटातून मुक्त करायचं असतं. आणि तुम्ही म्हणता, का हनुमान चालिसा म्हणायची? ही तुमची नवी विचारधारा आहे".

त्यांचा चित्रपट हीट झाला, तर तुमचा फ्लॉप होईल!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल राज ठाकरेंची तुलना 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटातल्या मुन्नाभाईशी केली. "मुन्नाभाई चित्रपट आला होता. कोणाबद्दल बोलताना ते म्हणाले की त्यांना बाळासाहेब दिसतात. मुन्नाभाई सुपरहिट पिक्चर होता, तसं हे हिट झाले तर तुम्ही सुपरफ्लॉप व्हाल. जे स्वप्न पाहतात, तेच ती पूर्ण करण्याची हिंमत ठेवतात. तुम्हाला त्यांच्या शालीबद्दलही समस्या आहे".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Priya Nair: 92 वर्षांत पहिल्यांदाच महिला CEOची निवड; HULच्या नेतृत्वाची जबाबदारी प्रिया नायर यांच्यावर

Video: दिल्ली पुन्हा 100 वर्ष मागे गेल्यासारखी दुरवस्था! पावसानंतरचा व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला लावाल हात

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

SCROLL FOR NEXT