Navneet Rana Accept uddhav Thackeray Challenge
Navneet Rana Accept uddhav Thackeray Challenge Navneet Rana and uddhav Thackeray
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंचे हनुमान चालिसाचे आव्हान राणांनी स्वीकारले; म्हणाल्या...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल औरंगाबादमध्ये सभा पार पडली. यामध्ये ठाकरेंनी विविध विषयांवरून हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) पठन करण्याच्या इशारा देणाऱ्या नवनीत राणांना हिंमत असेल तर, काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालिसा म्हणा असे आव्हान दिले होते. त्यानंतर आज राणा यांनी मुख्यमंत्र्याचे कालचे चॅलेंज स्वीकारले आहे. (Navneet Rana On CM Uddhav Thackeray Challenge )

काश्मीर हा भाग आहे आणि तेथे हनुमान चालीसा पाठ करणे कठीण आहे हे जर मुख्यमंत्री उद्धव यांना समजले तर, मी नक्कीच जाईन आणि काश्मीरमध्ये पाठ करेन असे म्हटले आहे. यासोबतच ठाकरेंनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचावी असे प्रतिआव्हानही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. ज्या दिवशी उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर हनुमान चालिसाचे पठन करतील त्या दिवशी मी काश्मीरमध्ये कधी आणि केव्हा हनुमान चालिसा वाचणार याची तारीख, वेळ जाहीर करेल असे राणांनी म्हटले आहे. औरंगाबादची जनता पाण्यासाठी चिंतेत असून, कालच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी त्याचा साधा उल्लेखही केला नाही असा घाणाघात नवनीत राणा यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी काल औरंगाबादेत मेळाव्याला संबोधित केले. या भाषणात त्यांनी औरंगाबादच्या जनतेच्या समस्यांवर मुख्यमंत्री म्हणून बोलायला हवे होते, तिथे मला काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पाठ करा, असे आव्हान त्यांनी दिल्याचे राणा म्हणाल्या. मुख्यमंत्री म्हणतात मंदिरात जाण्याची गरज नाही... हनुमान चालीसा वाचण्याची गरज नाही... मग तुम्ही हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व करता असे कसे म्हणता? असा प्रश्नदेखील नवनीत राणा यांनी यावेळी उपस्थित केला. औरंगाबादची जनता पाण्यासाठी चिंतेत असल्याचे नवनीत म्हणाले, कालच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्याचा उल्लेख केला नाही.

काश्मीरमधील टार्गेट किलिंग आणि काश्मिरी पंडितांवर भाष्य करताना नवनीत राणा म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा हे देशातील जनतेसोबत आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी हे सरकार प्रत्येक पाऊल उचलत असून, जनतेचा आणि देशवासीयांचा यावर विश्वास आहे. ते त्यांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास राणा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्ला

कालच्या औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी नुपूर शर्मा यांच्या विधानाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, भाजपकडून चूक झाली असताना देशाने माफी का मागायची? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आम्ही इतके पोकळ हिंदू समर्थक नाही की, तुमच्याकडून हिंदुत्व शिकावे, असेदेखील उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपला आव्हान देताना ते म्हणाले की, हिम्मत असेल तर काश्मीरमध्ये जा आणि हनुमान चालीसा पठन करा असा चॅलेंज त्यांनी यावेळी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT