Navneet Rana on Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

''दादा तुम्ही सर्वात जास्त काम करता'', नवनीत राणांची अजित पवारांना साद

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आम्हाला तुरुंगात वाईट वागणूक दिल्याचा आरोप राणा दाम्पत्यानं केला आहे. त्याची तक्रार दाखल करण्यासाठी आमदार खासदार पती-पत्नी दिल्लीला रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नवनीत राणांनी (Navneet Rana) ठाकरे सरकारवर सडकून टीका केली तर अजित पवारांना (Ajit Pawar) साद घातली. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं कौतुक केलं.

अजित दादा तुम्ही महिलांचा सन्मान करता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काम करत नाहीत. तुम्ही सर्वात जास्त काम करता. आमच्यावर लॉकअपपासून ते तुरुंगापर्यंत काय अन्याय झाला? याची माहिती घ्या. तुम्ही रोखठोक बोलणारे आहात. तुम्ही न्याय द्याल ही अपेक्षा आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या. ''हनुमान चालिसा आपल्या घरात किंवा मंदिरात वाचायची. दुसऱ्याच्या दारात कशाला जाता?'' अशी टीका अजित पवारांनी राणा दाम्पत्यावर केली होती. त्यालाही नवनीत राणांनी उत्तर दिलं असून अजित दादा तुम्ही सर्व माहिती घ्या आणि नंतर भाष्य करा, असं नवनीत राणा म्हणाल्या.

उद्धव ठाकरेंवर टीका, फडणवीसांचं कौतुक -

अमरावती आणि मुंबईत ठाकरेंच्या गुंडांनी वातावरण बिघडवलं आणि तुरुंगात आम्हाला टाकलं. आम्हाला तुरुंगात अत्यंत वेदना दिल्या आहेत. माझ्यावर तुरुंगात अन्याय झाला आहे. मला अतिशय वाईट वागणूक दिली आहे. याबाबत मी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींपासून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार देणार आहे, असं नवनीत राणा यांनी सांगितलं. तसेच त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. शिवसेनेने भाजपच्या पाठित खंजीर खुपसला असून त्यांनी आम्हाला सिद्धांताच्या गोष्टी शिकवू नये. बाळासाहेब खरे सिद्धांत पाळायचे. ते गेले आणि सिद्धांतही गेले. फडणवीसांना ५ वर्ष राज्य चालवलं. पण, असं सुडाचं राजकारण केलं नाही. त्यांच्याकडून काहीतरी शिका, असा सल्ला नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why is SIR Important: भारतात एसआयआर महत्त्वाचे का आहे? निवडणूक आयोगाने चार मोठी कारणे सांगितली!

Bhayandar accident : भाईंदर खाडी परिसरात 'चंदीगड एक्सप्रेस'मधून प्रवासी पडला; रेल्वे प्रशासनाकडून चौकशी होणार!

India SIR Schedule: बिहारनंतर देशातील १२ राज्यांमध्ये एसआयआर लागू, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, जाणून घ्या 'या' राज्यांची नावे

'मुंबई पुणे मुंबई 4' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेची केमिस्टी पुन्हा पहायला मिळणार, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : घाटकोपर रेल्वे स्थानक नजीक असलेल्या इमारतीला आग

SCROLL FOR NEXT