Navneet Rana Lok Sabha Election Esakal
महाराष्ट्र बातम्या

Navneet Rana Lok Sabha Election: नवनीत राणांच्या खासदारकीला सतराशे साठ अडथळे; ठाकूर, कडू आणि अडसुळांचं मिळणार आव्हान?

Navneet Rana Lok Sabha Election: नवनीत राणांना खासदारकी जड जाणार? यशोमती ठाकूर ते महायुतीतूनच तगडं आव्हान? जाणून घ्या सविस्तर

अक्षता पांढरे

लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलीये. त्यामुळे सगळ्यांच पक्षांचा फोकस सध्या या निवडणूकीवर आहे. आता बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे, त्यातून तयार झालेल्या नव्या युत्या, आघाड्यांमुळे जागावाटपाचं गणित अवघड होऊन बसलंय. पण सत्तेसाठी वरिष्ठ मंडळी चर्चा, बैठका घेऊन हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करतंय. जास्तीत जास्त जागा आपल्या पक्षाला कशा मिळतील, आपला उमेदवार कसा निवडणून येऊन यासाठी रणनिती आखली जातेय.

आता युती आघाडीचा फायदा जसा सत्तेस्थापनेसाठी होतो तसा आपल्या उमेदवाराला निवडणून आणण्यासाठी सुद्धा होतो. कारण मित्रपक्षांचं त्यांच्या कार्यकर्त्यांना समर्थन मिळतं. ही बाजू जरी सोपी वाटतं असली तरी स्थानिक राजकारणात मात्र हीच गोष्ट नाकी नऊ आणू शकते आणि याचा फायद्या होण्याऐवजी फटका बसण्याची शक्यता जास्त असते आणि याच गोंधळामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आलाय. ज्यामुळे नवनीत राणांच्या खासदारकीला सतराशे साठ अडथळे निर्माण झालेत.

नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार. २०१९ साली त्या अपक्ष खासदार म्हणून निवडणून आल्या होत्या. सगळ्यात आधी आपण अमरावती लोकसभा मतदारसंघ कसा आहे? तिथला खासदार कसा आहे हे पाहूयात... ह्या मतदारसंघामध्ये सध्या अमरावती जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.

बडनेरा विधानसभा मतदारसंघ

अमरावती विधानसभा मतदारसंघ

तिवसा विधानसभा मतदारसंघ

दर्यापूर विधानसभा मतदारसंघ

मेळघाट विधानसभा मतदारसंघ

अचलपूर विधानसभा मतदारसंघ

बडनेरा विधानसभा मतदारसंघात नवनीत राणांचे पति रवी राणा हे आमदार आहेत. जे अपक्ष आहेत.

अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या सुलभा संजय खोडके या आमदार आहेत

तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती चंद्रकांत ठाकूर या आमदार आहेत.

दर्यापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत बसवंत वानखडे हे आमदार आहेत.

मेळघाट विधानसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार दयाराम पटेल हे आमदार आहेत.

अचलपूर विधानसभा मतदारसंघात प्रहारचेच प्रमुख बच्चू कडू हे आमदार आहेत.

म्हणजे ६ पैकी ३ ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत २ ठिकाणी प्रहार आणि एका ठिकाणी अपक्ष.

आता २०१९ च्या लोकसभा निवडणूकीवेळी नवनीत राणांनी त्यावेळच्या भाजप - शिवसेना युतीच्या आनंदराव अडसुळांचा पराभव केला होता. आता नवनीत राणा जरी अपक्ष उमेदवार होत्या तरी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पुर्ण पाठिंबा होता. त्यामुळे विजय मिळवणं सोप होतं.

आता यंदाही नवनीत राणांनी खासदारकीची जय्यत तयारी सुरु केली. पण बदलेल्या राजकीय समीकरणामुळे यंदाची निवडणूक राणांना अवघड जाऊ शकते.

कारण नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या २०१९ च्या विजयात काँग्रेस- राष्ट्रवादीचा वाटा कोणीच नाकारू शकत नाही. या निवडणूकीच्या प्रचारावेळी नवनीत राणांनी सर्व जातीधर्मांचे झेंडें हातात घेऊन प्रचार केला होता. पण निवडून आल्यानंतर राणा दाम्पत्यांनी हिंदूत्वाची भुमिका साकारल्याचं दिसतं आणि त्यांचा कल हा भाजपकडे जास्त पहायला मिळतो.

त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत राणांना काँग्रेस- राष्ट्रवादीचा पाठिंबा काही मिळणार नाही. आता तुम्ही म्हणाल भाजप - शिवसेनचा मिळून राणांना पाठबळ देईल. पण अमरावतील राजकीय गणित जरा नाही पुर्ण वेगळं आहे. कारण अमरावतीतील लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतीनीधींच्या वेगळ्या राजकीय भुमिका.

यातलं पहिलं नाव म्हणजे यशोमती ठाकूर, यशोमती ठाकूर आणि राणा दाम्पत्य यांच्यातला वाद सगळ्या महाराष्ट्राला माहितेय. दोन्ही अमरावतीतल्या मोठ्या आणि धडाडीच्या नेत्या आहेत. नवनीत राणा या पहिल्याच टर्मच्या खासदार आहेत पण दिल्लीत त्यांची चांगलीच ओळत आहे. तर यशोमती ठाकूर या काँग्रेसमधील राज्यातील महत्वाच्या महिला नेत्या आहेत. त्या तीन वेळी आमदार आणि मंत्री सुद्धा राहिल्यात. या दोघीमध्ये वाद आहे तो अमरावतीतील वर्चस्वाचा.

त्यामुळे दोन्ही नेत्या एकमेकांवर अगदी टोकाचे आरोप प्रत्यारोप करत असतात. पण २०१९ ला पक्षाचा आदेश म्हणून यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांचा प्रचार केला. पण त्यावेळी सुद्धा राणा या निवडणून आल्यानंतर भाजपसोबत जातील असा सुर यशोमती ठाकुरांनी सुरुवातीपासून लावला होता. जे की खरं ठरलं. त्यामुळे यांच्यातला वाद चांगलाच वाढला.

काही दिवसांपुर्वी तर नवनीत राणांनी असाही आरोप केला की, यशोमती ठाकुरांनी २०१९ ला प्रचारासाठी पैसे घेतले होते. पण तरी प्रचार केला नव्हता. या आरोपांवर दोघींमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता.

पण आता नवनीत राणा भाजपच्या बाजूने आहेत. त्यामुळे आता यशोमती ठाकुरांना पाठिंबा राणांना मिळणं अशक्य आहे. आणि यशोमती ठाकुरांच्या तिवसा बरोबर अमरावती आणि दर्यापुरमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे त्यांना या तिनही मतदारसंघातून पाठिंबा मिळण्याची शक्यता धुसर आहे.

नवनीत राणांसमोरच दुसरं आव्हान आहे बच्चू कडू. बच्चू कडूंचा हा वाद नवनीत राणांपेक्षा त्यांचे पति रवि राणांसोबत जास्त आहे. बच्चू कडू हे अचलपूरचे आमदार आहे. आता जरी बच्चू कडू हे महायुतीत असले तरी राणांसोबतचा त्यांचा वादही कोणापासून लपून राहिलेला नाही. दोघांमधल्या वादाचं कारणही वर्चस्ववाद. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात नेहमीच खटके उडत असतात. कधी विधानसभेच्या जागेवरून तर कधी लोकसभेच्या जागेवरून.

काही महिन्यांपुर्वींच रवी राणांनी कडूंनी गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेतल्याचा आरोप होता. तसेच कडू 'तोडपाणी' करणारा आमदार आहे, असंही राणा म्हणाले होते त्यावरून दोघांमध्ये कलगीतुरा रंगला होता. अक्षरश: घरात घुसुन मारू असं म्हणण्यापर्यंत याच्यातले मतभेद गेलेत. या वादात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मध्यस्थी करावी लागली होती.

आता अचलपुरसोबत मेळघाट विधानसभेतही बच्चू कडूंच्या प्रहारचा आमदार आहे. पण रवी राणांसोबतच्या या वादाचा फटका नवनीत राणांना देखील बसू शकतो. कारण बच्चू कडू रोखठोक बोलणारे आमदार, ते भाजपवर टीका करताना सुद्धा पुढे मागे बघत नाही. त्यामुळे आपल्यावर केलेल्या या वादानंतर ते राणांना पाठींबा देतील ही शक्यता देखील धुसर आहे आणि त्यात बच्चू कडूंनी स्वत: आपल्या पक्षासाठी महायुतीने ही जागा द्यावी ही मागणी लावून धरली आहे.

भाजपने जागा नाही दिली तर आमची स्वबळावर लढण्याची ताकद असल्याचा इशारा देखील बच्चू कडूंनी दिला होता. पण सध्या ते एक पाऊल मागे आलेले पहायला मिळतायेत. त्यामुळे आता राणांना नाही म्हंटलं तरी बच्चू कडूंच्या प्रहारमधूनही आव्हान मिळू शकतं.

ते होत नाही तर आता नवनीत राणांपुढे नवं आव्हान आहे ते आनंदराव अडसुळांचे, आनंदराव अडसुळ हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार. दोन्ही नेते महायुतीतील पण २०१९ च्या पराभावानंतर दोघांमधला वाद चांगलाच पेटलाय. महायुतीतून राणांचे नाव समोर आल्यानंतर अडसुळांनी तर त्यांचा प्रचार करायाला साफ मनाई केली आहे.

एक वेळ राजकारणातून सन्यास घेईल पण राणांचा प्रचार करणाार नाही अशी स्पष्ट भुमिका अडसुळांनी घेतलीये. त्यामुळे नवनीत राणांच्या खासदारकीच्या मार्गात एक नाही अनेक अडथळे आहेत अशात राणांना आता कोणती रणनिती आखणार हे पाहणे महत्वाच ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT