Sanjay Raut with Rana Couple Sakal
महाराष्ट्र बातम्या

राऊतांसोबतच्या लेह भेटीत काय बोलणं झालं? नवनीत राणांनी केला खुलासा

सर्व खासदार तिथं येत असतात, आम्ही फक्त संसदीय कामकाजासाठी तिथे गेलो असल्याचं संजय राऊत म्हणाले होते.

वैष्णवी कारंजकर

मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याच्या मुद्द्यावरून एकमेकांवर टीकेची तोफ डागणारे संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लेहमध्ये वेगळ्याच मूडमध्ये दिसले. मुंबईत पक्क्या वैऱ्यांसारखे वागणारे लेहमध्ये मात्र एकमेकांशी मैत्र सांभाळताना दिसले. त्यांचे हे फोटोही व्हायरल होत होते. दरम्यान, या फोटोंवर तर्कवितर्कांना उधाण आलेलं असतानाच दोघांनीही याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. (Talks between Sanjay raut and navneet rana in Leh)

संजय राऊतांशी सगळं मागचं विसरून तुम्ही कसं काय बोललात, अशा आशयाचा प्रश्न आज माध्यमांनी दिल्लीमध्ये नवनीत राणांना विचारला. त्याबद्दल बोलताना राणा म्हणाल्या की, माझी लढाई, माझे विचार महाराष्ट्राच्या विकासासाठी आहेत. राऊत आले म्हणून मी जायचं नाही, हे मी करणार नाही. माझ्यावर मोठी जबाबदारी आहे, मी ती पार पाडण्यासाठी, समंजसपणा दाखवला आणि तशीच वागले. मी संजय राऊतांशी बोलले, याचा अर्थ माझी लढाई संपली असं नाहीये. मी त्यांच्यावर पूर्वी जी टीका केली, त्यांच्याविषयी जे काही आधी बोलले, ते माझं मत तसंच आहे.

लेह भेटीत राऊतांशी काय बोलणं झालं हे सांगताना नवनीत राणा म्हणतात की, मी त्यांच्या बैठकीपुरती बोलले, हे माझं प्रोफेशनलिझम. माझ्यावर अत्याचार झाले आहेत, त्यांच्यावर नाहीत. महाराष्ट्राची संस्कृती आणि समंजसपणा आम्ही जपला आहे, त्यांनी नाही. ते महाराष्ट्राच्या विकासात अडथळे आणत आहेत. मी त्यांना सांगितलं की, मला एका मुलीने विचारलं की बाईला कोणी पुढे काय येऊ देत नाही? त्यांना डॉमिनेट का करतात, तर मी तिला म्हणाले की, बाई मी पुढे आलेच ना. मला एकटीला पाहून मला त्रास देण्याचा प्रयत्न झाला. मला जेलमध्ये टाकणारे इथेच बसलेत. हा किस्सा ऐकल्यावर त्यावर संजय राऊतांकडे काहीच उत्तर नव्हतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT