politics google
महाराष्ट्र बातम्या

राऊतांविरोधात नवनीत राणांचं थेट दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र

आता नवनीत राणा दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

आता नवनीत राणा दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

हनुमाना चालीसा पठणावरून सध्या राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणावरून मुंबईत भाजप-शिवसेनेत मोठा राडा झाला होता. यामध्ये राणा पती-पत्नीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. खासदार नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर आरोपही केले आहेत. दरम्यान, आता नवनीत राणा दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात हे पत्र असल्याची माहिती मिळत आहे.

या पत्रात खासदार राणा यांनी लिहलंय की, मी अनुसूचित जातीची आहे. मी शिवसेना विरोधात निवडून आले आहे. त्यामुळे शिवसेना नेता कार्यकर्ते मला धमकावत आहेत. माझ्या जातीबाबत खोटे आरोप माझ्यावर लावले जात आहेत. मी निवडून आल्यावर खासदार संजय राऊत वारंवार माझ्या विरोधात बोलत आहेत. मी एका विशिष्ठ जातीची आहे हे माहित असतानाही मध्यामांना मुलाखती देताना आमचा बंटी आणि बबली असा उल्लेख करतात. राऊत मला बदनाम करत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. दिलीप वळसे पाटील बंगल्यावरुन निघत असून ते वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जात आहेत. माझ्या घराकडे शिवसैनिक आले त्यांनी आंदोलन करून घराला वेढा घातला. त्यामुळे संजय राऊत आणि शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात अट्रोसियटी कायद्या अंतर्गत तक्रार दाखल करावी, असं त्यांनी लिहलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोगस जात प्रमाणपत्र वापरणाऱ्या खासदारांनी पुन्हा लोकसभेत पुन्हा निवडून येऊन दाखवावं, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांना दिलं आहे. त्यांनी उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशाचा फोटो शेअर करत नवनीत राणा (Navneet Rana) यांचे जातप्रमाणपत्र बोगस असल्याचा दावाही केला आहे. 'हे लोक fraud..bogus, आम्हाला हनुमान चालीसा पाठ ऐकवणार', असंही राऊत यांनी ट्विट केलं होतं. माध्यमांसमोर त्यांनी याबाबत सातत्याने वक्तव्य केलं आहे. त्यावरून आता राणा यांनी थेट दिल्ली पोलिसांकडे राऊतांची तक्रार केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT