CP M. rajkumar esakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापुरात नवरात्रोत्सवही डीजेमुक्तच होणार! मध्यवर्ती मंडळांच्या एकाही पदाधिकाऱ्यांकडून ‘डीजे’ची नाही मागणी; पोलिस आयुक्त म्हणाले, साऊंड स्पीकरला परवानगी, पण...

सोलापूर शहरात नऊ मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळे असून त्याअंतर्गत १९३ मंडळांकडून देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. उत्सव शांततेत व आनंदात साजरा व्हावा, यासाठी शहरात पोलिस बंदोबस्त नेमला जाईल, असेही पोलिस आयुक्तांनी यावेळी सांगितले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : गणेशोत्सव डीजेमुक्त केल्याबद्दल सर्व मंडळांचे आभार मानत यंदाचा नवरात्रोत्सव देखील डीजेमुक्तच होईल, असा विश्वास पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी व्यक्त केला. बुधवारी (ता. १७) पोलिस आयुक्तालयात झालेल्या शांतता कमिटीच्या व नवरात्रोत्सव मंडळ आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी कोणीही ‘डीजे’ लावण्यासंदर्भात ब्र देखील काढला नाही. सर्वांनी डीजेमुक्त आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढण्याची ग्वाही दिली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवाजाची मर्यादा पाळून दिलेल्या वेळेत साऊंड स्पीकर लावण्यास परवानगी असणार असल्याचेही पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

पोलिस आयुक्तालयातील शांतता कमिटीच्या बैठकीचा हेतू उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी सांगितला. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व मंडळांना अधिकृत वीज कनेक्शन घेण्याची सूचना केली. तत्पूर्वी, मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी विजय पुकाळे, सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड, शिवानंद सावळगी यांच्यासह ॲड. प्रशांत कांबळे, विष्णू कारमपुरी, रूपाभवानी मंदिराचे मल्लिनाथ मसरे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, युवराज पवार, विक्रांत गायकवाड, सुशील सरवदे, श्रीनिवास मुरूमकर, शोभना सागर, विनोद इंगळे, विजय कोळी या सर्वांनी सूचना मांडल्या. त्यातील अनेकांनी लेझीमचा सराव करताना त्याठिकाणी पोलिस अंमलदार नेमावा, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, सार्वजनिक सीसीटीव्ही सुरू करावेत, विजेचा प्रकाश पुरेसा ठेवावा, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, रस्त्यांलगतच्या वायरी व झुडपे काढावीत, अशा सूचना मांडल्या.

मोकाट जनावरे, कुत्र्यांचा विषय ऐरणीवर

सोलापूर शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या खूप वाढली असून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी नवरात्रोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह शांतता कमिटीच्या बैठकीत सदस्यांनी केली. त्यावेळी मूळ मालक मोकाट जनावरे मोकळी सोडतात, दुधापुरतीच घरी नेतात. त्या मूळमालकांना आपण सर्वांनी सूचना कराव्यात. आम्ही मोकाट जनावरे पकडून गोशाळेत नेतोय, पण त्याला मर्यादा असल्याचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी स्पष्ट केले. मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणासाठी महापालिका काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

१९३ मंडळांकडून देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

सोलापूर शहरात नऊ मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळे असून त्याअंतर्गत १९३ मंडळांकडून देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. उत्सव शांततेत व आनंदात साजरा व्हावा, यासाठी शहरात पोलिस बंदोबस्त नेमला जाईल, असेही पोलिस आयुक्तांनी यावेळी सांगितले.

काहीजण स्वत:च्या स्वार्थासाठी गरीब मुलांना पुढे करतात...

गणेशोत्सवात डीजेमुक्तीचा निर्धार सर्वांनी केलेला असताना देखील काही पदाधिकाऱ्यांनी एका मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन डीजे लावा, कोणी काही करणार नाही, तुम्ही पोलिसांकडे परवानगी मागा असे सांगितले होते. त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आम्ही बैठक घेतली आणि ज्यांनी तशी मागणी केली त्यांना त्यांच्या नावे अर्ज करायला सांगा म्हटल्यावर कोणीही अर्ज केला नाही, असा अनुभव पोलिस आयुक्तांनी यावेळी सांगितला. काही लोक स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी गरीब कुटुंबातील तरुणांना पुढे करतात, ज्यावेळी गुन्हे दाखल होतात तेव्हा गरिबांची मुले अडकतात, असेही ते म्हणाले.

ठळक बाबी...

  • लेझीमसाठी साउंड पॅड लावण्यास असणार परवानगी

  • मंडळांना परवान्यावेळी महापालिकेला भरावे लागणारे शुल्क माफ होणार

  • मंडळांना उत्सवासाठी ऑनलाइन परवाना घ्यावा लागणार

  • नवरात्रोत्सवात रूपाभवानी मंदिरात सुरू राहणार आरोग्य शिबिर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Navy: नववर्षात नौदलाचे सामर्थ्य वाढणार! ‘तारागिरी’, ‘अंजदीप’ युद्धनौका लवकरच सेवेत

Success Story Women Farmers : कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतीतही महिलाराज; उद्योजकतेचा दिला साज

Latest Marathi News Live Update : स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मारकारच देवेंद्र फडणवीस करणार लोकार्पण

Save Tigers: धक्कादायक! देशात १६९ तर राज्यात ४१ वाघांचे मृत्यू; मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ४५ वाघांचे अधिक बळी..

Sinnar Accident : मोहदरी घाटात काळजाचा थरकाप! कंटेनरने समोरून येणाऱ्या वाहनांना चिरडले; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT