Sameer Wankhede Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

नवाब मलिकांवर कायदेशीर कारवाई करणार: समीर वानखेडे

नवाब मलिक यांनी वानखेडेंना वर्षभरात तुरुंगात टाकणार असं वक्तव्य केलं होतं.

सुधीर काकडे

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी क्रुझ ड्रग पार्टीवर एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर गंभीर आरोप केले आहेत. त्यातच आज त्यांनी आपण एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना वर्षभराच्या आत तुरुंगात टाकणार असल्याचं विधान केलं होतं. त्यातनंतर आता समीर वानखेडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते लवकरच महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत.

कोरोना काळात सिनेतारकांसोबत वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय हे मालदीवमध्ये होते असा आरोप मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांनी केलेल्या या आरोपानंपतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी त्यावर प्रतिक्रीया दिली आहे. 'नवाब मलिक यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. सेवेत रुजू झाल्यापासून मी कधीच दुबईला गेलो नाही. मी माझ्या बहिणीसह मालदीवला गेलो नाही. मी सरकारकडून अधिकृत रजा घेतली आणि माझ्या स्वतःच्या पैशाने माझ्या कुटुंबासह सहलीला गेलो. माझी बहीण स्वतंत्रपणे मालदीवला गेली होती. मलिक वारंवार माझ्या कुटुंबातील महिलांना लक्ष्य करत आहे, ही बाब चुकीची आहे. यासाठी मी लवकरच न्यायालयात दाद मागणार असून कायदेशीर मार्ग अवलंबणार असल्याचं समीर वानखेडे यांनी सांगितलं.

दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पून्हा एकदा वानखेडेंवर आरोप केले. एनसीबी करत असलेल्या कारवाईची प्रकरणं बोगस आहेत, त्यांना आपण लवकरच एक्सपोज करू असं सांगत नवाब मलिक यांनी 'वर्षभराच्या आत तुझी नोकरी जाईल' असं गंभीर वक्तव्य मलिक यांनी केलंय. नवाब मलिकच्या जावयाला तुरुंगात टाकताना वरून दबाव टाकणारा तुझा बाप कोण? तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी शांत राहणार नाही हे आव्हान असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT