nawab malik esakal
महाराष्ट्र बातम्या

...तर मी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार; नवाब मलिकांचे 'चॅलेंज'!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आर्यन खान (aryan khan drugs case) ड्रग्ज केस प्रकरणी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेले अनेक दिवस दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक समीर वानखेडे (sameer wankhede) विरोधात अनेक दावे ते करत आहेत. मलिकांच्या आरोपांना काल समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकरने (kranti redkar) पत्रकार परिषद घेऊन उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. तसंच आम्ही हिंदूच आहोत हे देखील तिने ठासून सांगितलं. पण मलिक त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत. दरम्यान नवाब मलिकांनी यावेळेस एक आव्हान केले आहे.

नवाब मलिकांचे चॅलेंज...

मी आतापर्यंत समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांवर ठाम आहे. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा ठरल्यास मंत्रिपद सोडायला तयार आहे. मी केलेले आरोप खोटे ठरवून दाखवा, असं आव्हानच मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांना दिले आहे. मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी समीर दाऊद वानखेडे यांचा जो मुद्दा समोर आणत आहे तो त्याच्या धर्माचा नाही. ज्या फसव्या मार्गाने त्याने IRS ची नोकरी मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवले आणि त्यामुळे एका पात्र अनुसूचित जातीच्या व्यक्तीला त्याच्या भविष्यापासून वंचित ठेवले आहे, ते मला समोर आणायचे आहे, असं ट्विट करत बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे समीर वानखेडेंनी फसव्या मार्गाने नोकरी मिळवल्याचा मलिक यांनी म्हटलं आहे.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आतापर्यंत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी सातत्याने पत्रकार परिषद घेऊन आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर सुरु झालेली आरोपांची मालिका अद्याप सुरुच आहे. याआधी वानखेडे यांच्या कारवांयावर नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर वानखेडेंनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोपही केला. आता समीर वानखेडे यांनी हिंदु असल्याचा दावा करत असताना मलिकांनी नवा खुलासा केला. ट्विटरवर त्यांनी गूड मॉर्निंग म्हणत समीर वानखेडेंचा पहिला निकाह झाला होता असं म्हटलं आहे. त्यांच्या या निकाहचे प्रमाणपत्र आणि फोटो देखील त्यांनी ट्विटरवर जाहीर केला आहे. एका तासापूर्वी मलिक यांनी ट्विट करत समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो प्रदर्शित केला आहे, जो डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत निकाह केल्याचा आहे. म्हणजेच मलिक वारंवार हेच स्पष्ट करु इच्छित आहे की समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊदच आहे आणि ते मुस्लिमच आहेत.

नवाब मलिकांनी म्हटलंय की, मी हे स्पष्ट करु इच्छितो की, मी जो समीर वानखेडेंबाबत खुलासे करत आहे, ते धर्मासंबंधी नाहीयेत. ज्यापद्धतीने फसवणूकीच्या मार्गाने त्यांनी IRS ची नोकरी प्राप्त करण्यासाठी एका मागासवर्गीय जातीच्या व्यक्तीवर अन्याय करुन खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे ही नोकरी मिळवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Patil: एकनाथ शिंदेंकडून संजय पाटलांची पाठराखण, पण फडणवीसांनी आरसा दाखवला; शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच वाचला

INDW vs BAN W Live: गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाची जगासमोर नाचक्की झाली; बांगलादेशने योग्य वेळी संधी साधली अन्...

Air India IndiGo Incident: अहमदाबाद विमानतळावरील अपघात टळला; दोन विमानं अचानक समोरासमोर; नेमकं काय घडलं?

INDA vs SLA Test: ऋतुराज गायकवाड, देवदत्तने संधी गमावली; साई सुदर्शनची सेंच्युरी, तर ध्रुव जुरेल, शेख राशीदची दमदार फिफ्टी

Pachod Rain : दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची दमदार हजेरी; शेतशिवार गजबजले, बियाण्यांच्या दुकानांत वाढली गर्दी

SCROLL FOR NEXT