Nawab Malik-Devendra Fadnavis google
महाराष्ट्र बातम्या

''देवेंद्र फडणवीसांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध'', मलिकांचा खळबळजनक दावा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मंत्री नवाब मलिक (nawab malik) हे वारंवार एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. मात्र, आता मलिकांनी नवा दावा केला आहे. त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former chief minister Devendra Fadnavis) आणि अमृता फडणवीसांवर (Amruta Fadnavis) आरोप केले आहेत. त्यांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध असल्याचा खळबळजनक दावा मलिकांनी केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण वेगळं वळण घेणार की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

''तुरुंगात बंद असलेला जयदीप राणा यांचं नातं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत आहे. फडणवीस महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना अमृता फडणवीसांनी रिव्हर साँग बनविले होते. यामध्ये सोनू निगम आणि अमृता यांनी गाण म्हटलं होतं. यामध्ये फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनय केला होता. डायरेक्टर सचिन गुप्ता होते. ते गाणं अभिजीत जोशी यांनी लिहिलेले होते. त्याचे फायनान्स हेड ड्रग्स पेडलर हा जयदीप राणा होता. जयदीप राणा आणि देवेंद्र फडणवीस यांचे घनिष्ठ संबंध आहेत,'' असं नवाब मलिक म्हणाले.

''फडणवीस ड्रग्स माफियांना संरक्षण देतात'' -

''जयदीप राणा यांच्यासोबत फडणवीसांचा काय संबंध आहे? याची चौकशी व्हायला पाहिजे. फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात ड्रग्सचे धंदे चालतात. जयदीप राणा हे फडणवीसांच्या घरच्या कार्यक्रमात उपस्थित राहतात. ड्रग्स रॅकेटला फडणवीस संरक्षण देतात'', असे आरोपही नवाब मलिकांनी केले आहेत.

जयदीप राणा साबरमतीमध्ये तुरुंगात -

''जयदीप राणा तुरुंगात बंद आहेत. दिल्लीतील एक प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आली होती. एका सुनावणीवेळी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते. त्यावेळी एनसीबीने सांगितले होते, की तो तुरुंगात आहे. मात्र, आता हा साबरमती तुरुंगात बंद असल्याची माहिती मिळते. फडणवीसांसोबत त्याचे घनिष्ठ संबंध आहेत'', असंही मलिक म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

T20 WC, IND W vs PAK W, Playing XI: हरमनप्रीत कौरने टॉसही जिंकला, पण पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं की नाही?

US Iran Deal: अमेरिका-इराण कराराचा मोठा मसुदा तयार! होर्मुज स्ट्रेट खुले होणार; तेलबंदी हटणार, डीलमध्ये काय ठरलं?

Latest Live Updates Marathi: तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी आज दिल्लीत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली

Waste Management: उरुळी कांचनमध्ये अत्याधुनिक घनकचरा प्रकल्पाला गती; देवस्थानकडून दोन एकर जागा

SCROLL FOR NEXT