Nawab Malik Sakal
महाराष्ट्र बातम्या

Nawab Malik : जेलमधल्या मलिकांना ईडीचा दणका; राहत्या घरासह कोट्यवधींची संपत्ती ताब्यात घेणार

नवाब मलिकांच्या तब्बल ८ मालमत्ता जप्त होणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शिंदे गटातले आमदार प्रताप सरनाईक यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच आणल्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा नवाब मलिकांकडे वळवला आहे. जेलमध्ये असणाऱ्या नवाब मलिकांचीही कोट्यवधींची संपत्ती आता ईडी जप्त करणार आहे.

हेही वाचा - एका सुफी विचारवंताच्या नजरेतले हिंदुत्व

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक सध्या कोठडीतच आहेत. या आधीही मलिकांची बरीच संपत्ती ईडीच्या ताब्यात आहे. मात्र आता ईडीकडून मलिकांच्या आणखी ८ मालमत्तांचा ताबा घेण्यात येणार आहे. यात कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड इथली मालमत्ता, उस्मानाबादमधली १४७ एकर जमीन, मुंबईतल्या ३ सदनिका आणि दोन राहत्या घरांचा समावेश आहे.

नवाब मलिक यांची गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चौकशी सुरू आहे. फेब्रुवारीपासून ते ईडीच्या कोठडीमघ्ये आहेत. चौकशीदरम्यान, ईडीने सगळ्या संपत्तीची माहिती गोळा केली आहे. त्यानंतर आता ईडी कारवाई करत आहे. याविषयी ईडी कायदेशीर सल्ला घेत आहे. कायदेतज्ज्ञांच्या मदतीने पुढची कारवाई होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT