Nawab Malik  sakal media
महाराष्ट्र बातम्या

मलिकांनी वानखेडे प्रकरणात मुंबई हायकोर्टात व्यक्त केला खेद; म्हणाले, 'चूक झाली...'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कुटुंबीयांबाबत यापुढे कोणतंही विधान करणार नाही, अशी हमी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली होती. हीच हमी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक यांनी मुंबई हायकोर्टात दिली आहे. नवाब मलिक यांनी हायकोर्टात (Mumbai Highcourt) बिनशर्त माफी मागितली असून यापुढे कोणतीही विधाने करणार नसल्याची पुन्हा एकदा हमी दिली आहे. गेल्या सुनावणीमध्ये कोर्टाला कोणतंही वक्तव्य करणार नसल्याची लेखी हमी देऊनही त्याचे हेतुत: उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर अवमान कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा कोर्टाकडून करण्यात आली. त्यांना कोर्टाने खडसावलं होतं. तसेच याबाबत १० डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेशही दिले होते.

यावेळी नवाब मलिक यांनी खेद व्यक्त करत पुन्हा असं वक्तव्य करणार नसल्याचं हमी देणारं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, मी फक्त सरकारी सेवक पदाच्या अधिकारात वक्तव्य केली. मी वानखेडे यांच्याविषयी कोणतीही व्यक्तिगत विधाने केली नाही, असं म्हटलंय. नवाब मलिक यांनी ज्येष्ठ वकील ऍस्पि चिनॉय यांच्यामार्फत हायकोर्टात हे म्हणणं मांडलंय. त्यांनी म्हटलंय की, या पूर्वी केलेल्या वक्तव्याविषयी मी खेद करतोय. हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. तसेच याबाबत बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे विधाने करणार नाही, अशी हमी देतो", अशी मलिक यांच्यातर्फे हायकोर्टात हमी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

नवाब मलिक यांच्याविरोधामध्ये समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे. यामध्ये निर्णय दिला जाईपर्यंत वानखेडे कुटुंबीयांविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी लेखी हमी मलिक यांनी दिली होती. मात्र त्यानंतरही आपल्या कुटुंबीयांवरील आरोपांच्या फैऱ्या सुरूच असल्याची बाब ज्ञानदेव यांनी न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती र्मिंलद जाधव यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर हायकोर्टाने नवाब मलिकांना खडसावलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT