chhagan bhujbal and nawab malik 
महाराष्ट्र बातम्या

मलिक माझे सहकारी, आमच्या दोघांच्या डिग्री 'रिटर्न फ्रॉम जेल'; भुजबळांची मिश्कील टिप्पणी

रवींद्र देशमुख

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना नुकताच जामीन मिळाला आहे. मागील एक वर्षाहून अधिक काळ ते कारागृहात होते. त्यामुळे त्यांच्या भेटीला राष्ट्रवादीतील अनेक नेते जात आहेत. त्यातच आज अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मलिक यांच्या घरी जावून भेट घेतली. यावेळी भुजबळ यांनी मिश्कील टिप्पणी केली.

भुजबळ म्हणाले, मलिक आमचे सहकारी आहेत. आमच्या दोघांच्या डिग्री आरएफजे म्हणजे 'रिटर्न फॉर्म जेल' आहे. आमचा सहकारी आजारी आहे. किडिनीचे प्रॉब्लम वाईट असतात जेलमध्ये हाताळणे कठीण आहे. आम्ही त्यांना तब्येत सांभाळण्यास सांगितल आहे.

शरद पवार यांचा फोटो वापरण्यावर भुजबळ म्हणाले की, आमची पार्टी एकच आहे. कदाचित पवार साहेब रागात बोलले असतील. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत ना? माझ्या मंत्रालयाच्या कार्यालयात त्यांचा मोठा फोटो आहे. ते आमचे नेते आहेत. आम्ही त्यांना मानतो, म्हणून प्रेमाने आम्ही त्यांचा फोटो लावला. हा काही गुन्हा आहे, असे मला वाटतं नाही, असंही भुजबळ यांनी नमूद केलं.

शरद पवार यांनी भाजप बरोबर न जाण्याचा स्पष्ट केलं. त्यावर भुजबळ म्हणाले की, त्यांची भूमिका आधीपासून तीच आहे, बाकी वावड्या मीडियात होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT