Chandrakant Jadhav esakal
महाराष्ट्र बातम्या

आमदार जाधव यांचं निधन, ही बातमी अत्यंत वेदनादायी : नवाब मलिक

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे आज हैदराबाद येथे निधन झाले.

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार व यशस्वी उद्योगपती चंद्रकांत पंडित जाधव (Chandrakant Jadhav) यांचे आज हैदराबाद (Hyderabad) येथे निधन झाले. त्यांच्या या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दुःख केलंय.

मलिकांनी आमदार जाधव यांना ट्विटव्दारे श्रद्धांजली अर्पण केलीय. आमदार जाधव यांचे दुःखद निधन झाले, ही बातमी अत्यंत वेदनादायी आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत, असं त्यांनी म्हंटलंय. 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Election) जाधव यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांचा पराभव केला होता.

मनमिळावू व कार्यतत्पर अशी ओळख असणाऱ्या श्री जाधव यांच्या मृत्यूने उद्योगासह राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या दीड वर्षापासून त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते ठणठणीत बरे झाले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai Night Cab Viral Video : "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं!"; पहाटे २ वाजता मुंबईत उतरलेल्या तरुणीने 'त्या' कॅबमधून प्रवास केला अन्... व्हिडिओ तुफान व्हायरल!

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT