Nawab-Malik sakal media
महाराष्ट्र बातम्या

सरकारी अधिकाऱ्याला धमकी; विखेंनी केली नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी

नबाब मलिक यांनी समीर वानखेडेंना वर्षभरात तुरुंगात टाकणार असं वक्तव्य केलं होतं.

सुधीर काकडे

क्रूझ ड्रग पार्टीनंतर राज्यात मोठं राजकीय घमासान सुरु झालं. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीने केलेल्या या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले. तसंच वानखेडे यांना वर्षभरात जेलमध्ये पाठवणार असल्याचे सांगितले. त्यावर आता भाजपनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काही चाड शिल्लक असेल तर त्यांनी मंत्री नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा असं म्हणत विखेंनी देखील या वादात उडी घेतली आहे.

नवाब राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारमध्ये काही चाड शिल्लक असेल तर त्यांनी मलिक यांचा राजीनामा घ्यावा. तसंच ते पुढे असंही म्हणाले की, सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या देणारा कॅबिनेटमंत्री आपण कधीही पाहिला नाही.

कोरोना काळात सिनेतारकांसोबत वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय हे मालदीवमध्ये होते असा आरोप मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांनी केलेल्या या आरोपानंपतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी त्यावर प्रतिक्रीया दिली आहे. 'नवाब मलिक यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. सेवेत रुजू झाल्यापासून मी कधीच दुबईला गेलो नाही. मी माझ्या बहिणीसह मालदीवला गेलो नाही. मी सरकारकडून अधिकृत रजा घेतली आणि माझ्या स्वतःच्या पैशाने माझ्या कुटुंबासह सहलीला गेलो. माझी बहीण स्वतंत्रपणे मालदीवला गेली होती. मलिक वारंवार माझ्या कुटुंबातील महिलांना लक्ष्य करत आहे, ही बाब चुकीची आहे. यासाठी मी लवकरच न्यायालयात दाद मागणार असून कायदेशीर मार्ग अवलंबणार असल्याचं समीर वानखेडे यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT