महाराष्ट्र बातम्या

पार्टीतील 'तो' व्हिडिओ मलिकांनी केला शेअर; ड्रग्ज माफिया वानखेडेंचा दोस्त?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणी एकामागोमाग एक खुलासे करणाऱ्या नवाब मलिकांनी आता आणखी काही ट्विट्स करत काही गोष्टी पुढे आणल्या आहेत. क्रूजवर त्या रात्री ड्रग्ज पार्टी आयोजित करणारा एक ड्रग माफीया होता, जो समीर वानखेडेंचा मित्र आहे, असा दावा त्यांनी केला होता. तो ड्रग्ज माफिया म्हणजे फॅशन टीव्ही इंडियाचा प्रमुख काशिफ खान होय. याला समीर वानखेडेंनी मुद्दाम सोडून दिल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. आता याच काशिफ खानचा क्रूजवर नाचतानाचा एक व्हिडीओ नवाब मलिकांनी ट्विट केला आहे.

नवाब मलिकांनी आज शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय की, तो दाढीवाला आहे काशिफ खान. फॅशन टीव्हीचा इंडिया हेड आहे. जगभरात तो फॅशन शो आयोजित करतो. ड्रग्ज आणि सेक्स रॅकेट चालवण्याचं काम करतो. त्या दिवशीचं आयोजनामध्ये एक आयोजन काशिफ खानकडून झालं होतं. त्याने सोशल मीडियावर आमंत्रण टाकलं होतं. त्या दिवशी क्रूझवरील व्हिडीओमध्ये तो आपल्या मैत्रीणीसोबत नाचताना दिसून आला. त्याची अटक का झाली नाही, हा सवाल मी वानखेडेंना विचारलं होतं. हा पॉर्न, सेक्स आणि ड्रग्ज रॅकेट चालवणारा व्यक्ती आहे. अनेकवेळा एनसीबीने त्याच्यावर कारवाईचे प्रयत्न केले आहेत मात्र वानखेडेंनी तेंव्हा अडवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

Pune News: हिंजवडीत दूषित पाणी पिण्याची नामुष्की; सोसायट्यांमधील स्थिती, शुद्धीकरणानंतरही दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

SCROLL FOR NEXT