Nawab malik-samir wankhede google
महाराष्ट्र बातम्या

क्रूझवरील 'दाढीवाला' आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया वानखेडेंचा दोस्त: मलिक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आतापर्यंत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी सातत्याने पत्रकार परिषद घेऊन आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर सुरु झालेली आरोपांची मालिका अद्याप सुरुच आहे. याआधी वानखेडे यांच्या कारवांयावर नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले होते. आता मलिकांनी आणखी एक पत्रकार परिषद घेत मोठा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांचा आंतरराष्ट्रीय ड्रग माफियाशी संबंध असल्याचा मोठा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

त्या दिवशी क्रूझवर आंतराराष्ट्रीय ड्रग माफिया देखील होता. तो तिहारजेल मध्ये राहिला होता, तो याआधी राजस्थानच्या जेलमध्ये राहिला होता, असा मोठा ड्रग माफिया वानखेडेंच्या ओळखीचा आहे, तो मोकाट आहे, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. तसेच या प्रकरणातील आरोप गांभीर्याने घ्यावेत. एनसीबीने या दिशेने तपास सुरु करावा. सत्या काय आहे ते नक्कीच बाहेर येईल. यासाठी वानखेडे, वानखेडेंचे चालक, प्रभाकर साईल यांचा सीडीआर तपासावा, अशी मागणी मलिकांनी केली आहे. मला आलेलं निनावी पत्र एनसीबीच्या डिजींना पाठवलंय, असंही ते म्हणाले आहेत.

त्यांनी म्हटलंय की, आपल्या मेहबुबसोबत तो माफिया नाचत होता. त्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. जाणीवपूर्वक पार्टी आयोजित केली गेली आहे. एनसीबीच्या प्रमुखांना दाढीवाला सापडत नसेल तर त्यांनी माझ्याकडे यावं, मी त्यांना नावासहित फोटो देईल. मोठा आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया त्या दिवशी क्रूझवर होता. त्यानेच पार्टी आयोजित केली होती. दाढीवाला असणारा हा माफिया याआधी राजस्थानच्या जेलमध्ये पण होता. ती पार्टी महाराष्ट्र पोलिसांची परवानगी न घेता आयोजित केली होती. तो माफिया वानखेडेंच्या ओळखीचाच आहे. क्रूझच्या सीसीटीव्ही तपासावी, सारं सत्य बाहेर येईल, असा दावा मलिकांनी केला आहे.

आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मलिक यांनी वानखेडे, के.पी. गोसावी, प्रभाकर साईल आणि वानखेडेंच्या चालकाच्या सीडीआर तपासणीची मागणी केली आहे. इलेक्ट्रॉनिक तपास झाल्यास काही शंका राहणार नाही, असं मलिक यांचं मत आहे. मुंबईत झालेल्या क्रूझ पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आपल्या बंदुकधारी प्रेयसीसह सहभागी असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. याविषयी बोलताना मलिक म्हणाले, ही ड्रग पार्टी फॅशन टीव्हीने आयोजित केली होती. कोविड प्रोटोकॉल असूनही महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती, पोलिसांना या पार्टीची माहिती देण्यात आली नव्हती. गृहविभागालाही याबद्दल काही कल्पना नव्हती. या पार्टीत लक्ष्य करण्यात आलेल्या लोकांचे फोटो देऊन त्यांना अडकवण्यात आलं. पण माझ्या माहितीनुसार, त्या पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफिया उपस्थित होता. त्याच्यासोबत त्याची बंदुकधारी प्रेयसीही होती. जो तिथे नाचत असल्याचं दिसत आहे, तो दाढीवाला आहे. तो दाढीवाला कोण आहे हे NCB च्या सर्वांना माहित आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, तो काही काळ तिहार कारागृहात होता, राजस्थानच्या कारागृहातही होता. याची मैत्री वानखेडेंसोबतही आहे. काही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की गोव्यातही त्यांचं मोठं रॅकेट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT