Nawab Malik Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

ही तर सुरूवात; वानखेडेंना आर्यन खान प्रकरणावरून हटवताच मलिकांंचं ट्विट

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

सुधीर काकडे

मुंबई जवळ समुद्रात सुरू असलेल्या क्रूझ ड्रग पार्टीवर एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी कारवाई केली होती. यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यनला देखील एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर या कारवाईवर संशय व्यक्त करत नवाब मलिक यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यातच आता समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणातील तपास कार्यातून काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विट करत प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी या प्रकरणात खंडणी वसूलीचा प्रयत्न केल्याचा असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर आता त्यांना या प्रकरणावरून हाटवण्यात आल्यानंतर मलिक यांनी 'आर्यन खान प्रकरणासह 5 प्रकरणांमधून समीर वानखेडे यांची हकालपट्टी झाली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसंच एकूण २६ प्रकरणे तपासण्याची गरज आहे. ही फक्त सुरुवात आहे... ही व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी अजून बरंच काही करावं लागेल आणि आम्ही ते करू असंही ते पुढे म्हणाले आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांना या प्रकरणावरून काढल्यानतंर त्यांची दिल्लीला बदली करण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे. समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर एनसीबीकडून त्यांची चौकशी देखील सुरू झाली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांचा या प्रकरणातील पुढचा तपास कसा होणार हे आता पाहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारचं हेच महागाई नियंत्रणाचं सूत्र, शरद पवारांचा गॅस दरवाढीवरून टोला; शेवटी इशाराही दिला

26/11 वेळी 20 गरोदर महिलांचे प्राण वाचवणारी ती परिचारिका कोण ? कंगनाने साकारलीय भूमिका

Photos : 1000 वर्षे जुनी प्राचीन शिलालेखांची कलाकृती सापडली; काळाच्या ओघात दडलेला 7व्या- 8व्या शतकाचा इतिहास, फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही

Mumbai: मुंबईत लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, मित्र-मैत्रिणींसोबत मद्यपान केले अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT