audio clip viral esakal
महाराष्ट्र बातम्या

"मुझे कोई नाटक नही चाहिए.." NCBचे सिंग आणि सॅम्युअलचं संभाषण व्हायरल

ओमकार वाबळे

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणात आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. मलिक आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र, याआधीच त्यांनी एक ऑडिओ क्लिप ट्वीट केली आहे. यामध्ये एनसीबीचे अधिकारी व्हीव्ही सिंग आणि सॅम डिसूझा यांच्यातील संभाषण आहे, असा दावा मलिक यांनी केलाय. या संभाषणात सॅम या अधिकाऱ्याला भेटण्याचा दिवस ठरवत आहे.

दोघांमधील संभाषणाचा मराठी सारांश

सॅम - हॅलो... सर सॅनविल बोलतोय!

व्हीव्ही सिंग - कोण सॅनविल?

सॅम - सर, तुम्ही एक नोटिस पाठवली आहे मला...

व्हीव्ही सिंग - अच्छा, सॅनविल.. वांद्र्यात राहतो ना तू?

सॅम - हो सर... मी जरा बाहेर होतो. माझी तब्येत बरी नाही.

व्हीव्ही सिंग - मग आता परत ये!

सॅम - मी अजून पोहोचलेलो नाही सर. तब्येत अजूनही खराब आहे. मला आणखी एक दिवस हवा आहे.

व्हीव्ही सिंग - मग कधी येशील?

सॅम - सर, मी सोमवारी येऊ का?

व्हीव्ही सिंग - सोमवारी नको, मग बुधवारी ये. सोमवारी मी नाहीय.

सॅम - ओके सर.

व्हीव्ही सिंग - आणि ऐक. येताना मोबाईल घेऊन ये! मला आता जास्त नाटकं नको आहेत. माझ्याकडे तुझा आयएमआय नंबर आहे. तोच फोन घेऊन ये. मी तुला आधीच वॉर्निंग देतोय.

सॅम - ओके, सर मी तसं नाही करणार!

व्हीव्ही सिंग - ओके, मग ये बुधवारी!

यासंभाषणानंतर आता आर्यन खान प्रकरणाने पुन्हा नवा ट्विस्ट घेतला आहे. नवाब मलिक यांनी संभाषण व्हायरल करण्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी समीर वानखेडे यांचे भाजपच्या काही नेत्यांशी असलेले संबंध उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये भाजपचा माजी युवा मोर्चा अध्यक्ष मोहित कुंबोज हाच या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच व्हि व्हि सिंग आणि सॅम यांच्या संभाषणावर प्रकाश टाकला. सॅम याचे आधीच्या एका प्रकरणात असलेल्या संबंधांचाही मलिकांनी खुलासा केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT