Nawab Malik Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nawab Malik: "मलिकांची तब्येत ठिकठाक, त्यांना तातडीने आर्थर रोड जेलमध्ये पाठवा'', भाजप नेत्याची मागणी

वैद्यकीय जमिनावर बाहेर आलेल्या नवाब मलिकांनी हिवाळी आधिवेशनाला हजेरी लावली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेटर बॉम्बनंतर आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी देखील आमदार नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिकांची तब्येत ठिकठाक दिसत असल्यामुळे त्यांना उपचारांची गरज नाही असं कंबोज यांनी म्हटलं आहे.

मोहित कंबोज यांनी एक्स(ट्विटर)वर एक पोस्ट लिहली आहे. 'मिया नवाब मलिक यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द करावा. उपचारांसाठी जामीन, अधिवेशनात सहभागी होण्यासाठी नाही. कचरा सेठची तब्येत ठणठणीत आहे असं पाहून वाटतंय त्यांना कोणत्याही उपचारांची गरज वाटतं नाही. त्यांनी पुन्हा तातडीने आर्थर रोड जेलमध्ये पाठवावं', असं कंबोज यांनी म्हटलं आहे.

प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला होता. तो आणखी दोन महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे. नवाब मलिक यांची ऑगस्ट महिन्यामध्ये तब्बल एक वर्ष पाच महिन्यांनी जेलमधून सुटका झाली होती. सातत्याने त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल करत न्यायालयात दाद मागितली होती.

वैद्यकीय जमिनावर बाहेर आलेल्या नवाब मलिकांनी हिवाळी आधिवेशनाला हजेरी लावली आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी सत्ताधारी अजित पवार गटाच्या आमदारांसोबत ते सभागृहात बसल्याचे दिसून आले. त्यानंतर नवाब मलिक यांच्यावरून पहिल्याच दिवशी सभागृहात घमासान झाले.

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करताना तुम्ही देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाहीत, असा घणाघात केला. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाहीत, असे सांगितले.

दुसरीकडे मलिकांच्या एंट्रीमुळे महायुतीतच वाद सुरू झाले आहेत, फडणवीस यांनी काल थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले, मलिकांवर आरोप असताना त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. फडणवीस यांच्या या भूमिकेचे शिंदे गटानेही समर्थन केले आहे. त्यानंतर अजित पवारांनी फडणवीसांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांनी त्यांची भूमिका जाहीर केल्यानंतर मी माझा निर्णय आणि भूमिका जाहीर करेन असं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोनं-चांदी सुसाट! जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे MCX बाजारात सोनं २ हजारांनी महागलं; मकर संक्रांतीला भाव कमी होणार?

ट्रम्प व्हेनेझुएलाचे काळजीवाहू राष्ट्रपती, स्वत:च शेअर केला फोटो; काय म्हणाले?

IND vs NZ 1st ODI : भारताला मोठा धक्का! रिषभ पंतनंतर आणखीन एका सुपरस्टारची मालिकेतून माघार; वर्ल्ड कपपूर्वी वाढली चिंता

Stray Dog Killing Telangana : धक्कादायक घटना ! तीन दिवसांत ३०० भटक्या कुत्र्यांची हत्या, सरपंच अन् ग्रामसचिवाने लावली विल्हेवाट

MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!

SCROLL FOR NEXT