NCB Sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी कारवाई! जहाजातून 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त

एसीबीने आणि भारतीय नौदलाने ही संयुक्तीक कारवाई केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (Narcotics Control Bureau) म्हणजेच एसीबीने (NCB) आज भारतीय नौदलाच्या (Indian Navy) मदतीने अंमली पदार्थाने भरलेल्या एक जहाज सीझ केले आहे. या कारवाईबाबत भारतीय नौदलाने स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. एनसीबीने ड्रग्जविरोधात केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

कारावाईदरम्यान, जहाजातून तब्बल 800 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, यामध्ये चरस (Charas) आणि हेरॉईनचा (Heroin) आदी ड्रग्जचा समावेश असून, या अंमली पदार्थाची बाजारातील किंमत तब्बल 2 हजार कोटी रुपये इतकी आहे. भारतीय नौदल देशाला ड्रग्जमुक्तीसाठी योगदान देण्यास कटिबद्ध असल्याचे देखील ट्विटमध्ये नमुद करण्यात आले आहे.

या कारवाईत समुद्रातून 529 किलो चरस, 234 किलो क्रिस्टल मेथाम्फेटामाइन आणि काही प्रमाणात हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. एनसीबी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. या कारवाईत नेमकं किती जणांना अटक करण्यात आलंय याबाबतची माहिती मिळालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: "भोवताली दाटला अंधार..."; राजकीय निर्णयाआधी ओमराजे निंबाळकरांची भावूक पोस्ट

IND W vs SA W T20 World Cup: भारतीय महिलांची आज दक्षिण आफ्रिकेशी लढत; कधी, कुठे आणि कशी पाहाल लाईव्ह मॅच?, कशी असेल प्लेइंग-११?

Video: पवारांच्या खासदाराचा नादच वेगळा! खऱ्याखुऱ्या 'टायगर'च्या गळ्यात पट्टा बांधून मारला फेरफटका; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये 30 जूनपर्यंत स्विमिंग पूल बंद

खासदार वडील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार, नगरसेवक लेक उद्धव ठाकरेंच्या भेटीला; म्हणाली, निष्ठेने काम...

SCROLL FOR NEXT