Supriya Sule News esakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule : 'आता शांत बसणार नाही, लोकांच्या घरात घुसून...' समीर वानखेडे प्रकरणात सुप्रिया सुळे संतापल्या

संतोष कानडे

मुंबईः अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणी एनसीबीचे तत्कालीन प्रमुख समीर वानखेडे यांची मागील दोन दिवसांपासून सीबीआय चौकशी सुरु आहे. या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, समीर वानखेडे यांच्याबाबत नवाब मलिक जे बोलत होते ते आता खरं व्हायला लागलं आहे. शाहरुख हा मोठा अभिनेता आहे. त्याच्या मुलाबाबत असं होत असेल तर सामान्यांच्या मुलांचं काय हाल होत असतील? त्यामुळे समीर वानखेडे यांचा मुद्दा मी संसदेत मांडणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

सुळे पुढे म्हणाल्या की, लोकांच्या घरामध्ये घुसून बायका-पोरांवर असा अन्याय करणं चुकीचं आहे. त्यामुळे या प्रकरणी सभागृहात आवाज उठवणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

समीर वानखेडे यांची एनसीबीने चौकशी केल्यानंतर २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. याप्रकरणी आता सीबीआय वानखेडे यांची चौकशी करीत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सीबीआयने वानखेडेंची कसून चौकशी आहे.

समीर वानखेडे यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये शाहरुख खानने मुलासाठी याचना केल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. तसे व्हॉट्सअप चॅट वानखेडेंनी कोर्टाला दिल्याचं सांगण्यात येतंय.

क्रांती रेडकरचा व्हीडिओ

समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने सोशल मिडियावर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने कुणाचंही नाव न घेता तिच्या नवऱ्याविरुद्ध होणाऱ्या कारवाईबद्दल भाष्य केले आहे.

क्रांतीने अतिशय मार्मिकपणे तिचं मत या व्हिडिओच्या माध्यमातून माडलं आहे. खरतरं क्रांतीनं या व्हिडिओत सत्याचा खरा अर्थ काय हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारणारी व्यक्ती केवळ ‘मुस्लिम’ राहते, High Court ने काय सांगितलं?

IND vs IRE, T20I: पोरं तर पोरं, आयर्लंडच्या पोरींनी पण भारताला हरवल्याचं केलं भन्नाट सेलिब्रेशन; Video Viral

Latest Marathi News Live Update : महापौर हिमगौरी आडके अतिक्रमणांविरोधात रस्त्यावर, अनधिकृत बांधकामांवर थेट कारवाई

Tilari National Park : कोकणचे 'अ‍ॅमेझॉन' आता बदलणार! सिंधुदुर्गात होणार अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने भव्य नॅशनल पार्क, जाणून घ्या सरकारचा मेगा प्लॅन?

Gold Rate Today: 11 हजारांनी घसरल्यानंतर सोन्याने घेतला U-Turn! ग्राहकांना मोठा झटका? जाणून घ्या आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT