महाराष्ट्र बातम्या

समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील फोटो आला समोर

रश्मी पुराणिक

नवाब मलिक यांनी ट्विटरवर एक क्रॉप केलेला फोटो शेअर केला आहे. याला पहचान कौन असा कॅप्शन दिला आहे.

कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणातून दररोज नवनवे खुलासे होत आहेत. एनसीबीने केलेल्या कारवाईवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी शंका उपस्थित करत अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी काही फोटोही समोर आणले आहेत. नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही म्हटलं की मलिक इतका विषय मांडतायत त्यातून दिसतंय की काहीतरी गडबड आहे.

नवाब मलिक यांनी ट्विटरवर एक क्रॉप केलेला फोटो शेअर केला आहे. याला पहचान कौन असा कॅप्शन दिला आहे. हा फोटो एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच त्यांच्या पहिल्या लग्नातील हा फोटो असल्याचंही सांगण्यात येतंय. याबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नसली तरी मलिक यांनी क्रॉप करून शेअर केलेल्या फोटोचा पूर्ण फोटो व्हायरल होत आहे.

समीर वानखेडे यांचे पहिले लग्न डॉक्टर शबाना कुरेशी हिच्याशी झाल्याचा दावा केला जात आहे. २००६ मध्ये समीर वानखेडेंचे लग्न शबाना यांच्याशी झाल्याचं म्हटलं जातंय. तेव्हाचा पूर्ण फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यातीलच समीर वानखेडे यांचा फोटो क्रॉप करून नवाब मलिक यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT