Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: आठ दिवस अजित पवार कुठे होते? स्वतः केला खुलासा

अजित पवार नाराज असल्याची चर्चा

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मागील काही दिवसांपासून राज्यासह माध्यासमोर न दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाष्य करत पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (NCP Ajit Pawar clarify absence 8 days public appearance maharashtra political crisis )

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर पार पडले होते. शिबिराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन हजर राहिले होते. मात्र, अजित पवार गैरहजर दिसले. त्यामुळे अजित पवारांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली होती.

दरम्यान, आठ दिवसांनी माध्यमांसमोर आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. मी नाराज असल्याच्या अफवा आहेत. पाच दिवस मी आजारी होतो. त्यामुळे मी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली नव्हती. खोकला सुरू झाला होता, त्यात प्रकृती बरी नव्हती. आता तब्येत बरी आहे. पण काहीही बातम्या सुरू झाल्या होत्या, असे म्हणत नाराजीच्या चर्चांना अजिप पवारांनी पुर्णविराम दिला.

तसेच, माझा खासगी दौरा होता. सहा महिन्यापूर्वी मी तिकीट काढली होती. मला खासगी आयुष्यदेखील आहे. असही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.

अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. शिर्डी येथील शिबिरात अजित पवारांची अनुपस्थिती म्हणजे दादा नाराज तर नाहीत ना, गुवाहटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून राहा रे कुछ तो गडबड है, असं ट्वीट मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केलं होतं तर दुसरीकडे शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी अजित पवार यांची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही असं म्हटलं होते. गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India च्या विमानाने उड्डाण घेताच इंजिनमध्ये बिघाड, दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानाचं Emergency Landing ; अहमदाबाद अपघाताची पुनरावृत्ती टळली!

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट ! ४० लाख लाभार्थी अपात्र ठरणार? महिला व बालकल्याण विभागाकडून संकेत

Mumbai Indiansचे भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात वर्चस्व! MI चे ४, तर KKR चे ३ जणं; RCB, RR, LSG चे एकही खेळाडू नाही

आधी केला न्यूड कॉल मग लग्नाचा दबाव, दोन दिवस सोबत राहिली अन्...सत्य समोर येताच तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली!

Latest Marathi News Live Update : संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

SCROLL FOR NEXT