NCP Ajit Pawar demand Shinde fadanvis govt On agitation over Ratnagiri barsu refinery project survey  
महाराष्ट्र बातम्या

Ratnagiri Refinery News : दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका; अजित पवारांची राज्य सरकारला विनंती

रोहित कणसे

बारसू-सोलगाव रिफायनरीसाठी सर्वेक्षण सुरू केलं जाणार आहे, मात्र या सर्वेक्षणाला स्थानिकांकडून तीव्र विरोध नोंदवला जात आहे. स्थानिकांच्या या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ट्वीट करत सरकारला आंदोलकांशी चर्चा करण्याची विनंती केली आहे. तसेच हे सर्वेक्षण स्थगित केलं जावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. (Ratnagiri barsu refinery project survey )

अजित पवार यांनी ट्वीट करत याबद्दलची मागणी केली आहे. खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी उष्माघाताने काही नागरिकांचा मृत्यू झाला होता. याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी असेही अजित पवार म्हणाले आहेत.

"रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. आंदोलक ठाम असून त्यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी", असे अजित पवार म्हणाले आहेत.

सर्वेक्षण स्थगित करावं, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका, अशी सरकारला विनंती आहे. सर्वेक्षण त्वरित स्थगित करावं , असं ट्वीट अजित पवारांनी केलं आहे.

आंदोलकांवर कारवाई

आजपासून रिफायनरीच्या जागेचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच स्थानिकांच्या विरोधाला सामोरं जावं लागत आहे. याआधी रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्यासोबत इतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. इतकेच नाही तर याठिकाणी आंदोलन करणाऱ्या २५ महिलांना देखील पोलिसींनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT