ncp ajit pawar first reaction on sharad pawar death threat marathi news  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : शरद पवारांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सकाळ डिजिटल टीम

आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली. मुंबईतील पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे अज्ञात व्यक्तीने फोन करुन ही धमकी दिली. मुंबईत येऊन पवार यांची हत्या करणार असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. दरम्यान यावर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांनी शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती सापडली आहे तसेच त्या व्यक्तिच्या मानसिक स्थितीबद्दल पोलिस चौकशी करतील असं म्हटलं आहे.

हेही वाचा - इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांना धमकी देणारी व्यक्ती बाहेरच्या राज्यातील आहे. ती विकृत आहे की त्याच्यावर मानसिक परिणाम झाला आहे, याची चौकशी करण्याचं काम पोलीसांचं आहे. परंतु, त्यांचे फोन येते होते, ती व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. अतिशय खराब शब्द वापरत होती. याबद्दलची तक्रार केल्यानंतर ती व्यक्ती सापडली आहे आणि तपास सुरू आहे.

आरोपींनी हिंदीत धमकी दिली. या धमकी प्रकरणात ग्रामदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध 294 आणि 506 (2) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT