Narendra Modi Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

NCP Ajit Pawar News : सगळ्या आरोपातून पक्षाला मुक्त केलं याचा आनंद; शरद पवारांनी मानले PM मोदींचे आभार

रोहित कणसे

अजित पवारांनी बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयाच्या उपस्थितीत राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या राजकीय भुकंपानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवारांच्या शपतविधीनंतर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले आहेत.

शरद पवार म्हणाले की, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काँग्रेस पक्षाविरोधात आणि त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष असल्याचे सांगितले होते. हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला तसेच सिंचन विभागाबद्दल जी तक्रार होती याचा उल्लेख केला. यासोबत त्यांनी राष्ट्रवादी पक्ष या भ्रष्टाचारात सहभागी आहे असा उल्लेख केला होता.

पवार पुढे म्हणाले की, मला आनंद आहे की आज मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली याचा अर्थ त्यांनी केलेला आरोप वास्तव नव्हते. या सगळ्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्या बद्दल त्यांनी आरोप केले होते, त्या सगळ्यांना मुक्त केलं यासाठी मी प्रधानमंत्र्यांचा आभारी आहे असे शरद पवार म्हणाले.

या पूर्वकल्पना नव्हती

आज राजभवन येथे अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर इतर आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतीली आहे. दरम्यान शरद पवारांनी या सर्व घडामोडींची कुठलीही माहिती नव्हती, तसेच अजित पवार यांच्यासोबत देखील कुठलीही चर्चा झाली नाही हे यावेळी स्पष्ट केलं. शपथविधीपूर्वी फक्त भुजबळांशी बोलणं झालं होतं असेही शरद पवारांनी सांगितले.

'या' आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

  1. अजित पवार

  2. छगन भुजबळ

  3. दिलीप वळसे पाटील

  4. हसन मुश्रीफ

  5. धनंजय मुंडे

  6. धर्माराव अत्राम

  7. आदिती तटकरे

  8. संजय बनसोडे

  9. अनिल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT