NCP Ajit Pawar on bjp involvement in maharashtra political crisis eknath shinde  esakal
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात? अजित पवारांचं तीन शब्दात उत्तर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत, यादरम्यान महाविकास आघाडी सरकार देखील धोक्यात आलं आहे, यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पार्श्वभूमीवर आमचा प्रयत्न महाविकास आघाडी टिकवण्यसाठी असणार आहे असे सांगितले आहे. या बंडामागे भाजप असल्याचे अजून दिसत नाही असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना पूर्णपणे पाठिंबा असून, राज्यातील सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करत राहू हे देखील स्पष्ट केलं आहे.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकनाथ शिंदेच्या बंडामागे भाजप असल्याचं अजून तरी दिसून येत नाही असे देखील स्पष्ट केलं. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना पवार म्हणाले कीस, निधी वाटपात कोणताही दुजाभाव केला नाही. सराकार टिकवण्याची जबाबदारी सर्वच पक्षांची आहे आणि एकनाथ शिंदेसोबतचे आमदार स्वखुशीने गेले की बळजबरीने हे शोधावे लागेल असे देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

आमचा प्रयत्न महाविकास आघाडी टिकवण्यसाठी असणार असून, कायमच राष्ट्रवादीचा पाठिंबा शिवसेनेला असेल असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदेंच्या या बंडामागे भाजपचा हात आहे असा प्रश्न अजित पवारांना विचारला असता ते म्हणाले की, या बंडामागे सध्यातरी भाजपच्या कोणत्या मोठ्या नेत्याचा हात दिसून येत नाहीये.

काहीवेळापूर्वी नाना पटोले यांनी केलेल्या निधीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले की, आमच्या मित्रपक्षांकडून निधीबाबत काही आरोप केला जात आहेत, पण मी निधीसाठी कुणामध्ये दुजाभाव केला नाही. सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे. पण त्यांनी तसं वक्तव्य का केलं हे माहिती नाही. राऊतांनी अगोदर महाविकास आघाडी २५ वर्षे टिकेल असं सांगितलं होतं. त्यानंतर राऊतांनी आज वेगळं विधान केले आहे. त्यामुळे राऊतांच्या विधानासारखं उद्धव ठाकरेंच्या मनात काही आहे का, हे आम्ही विचारू, असेही अजित पवार यांनी सांगितले.

आम्ही सर्वांनी मिळून ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवलं आहे. आमदारांना परत आणण्यासाठी राऊत तसं बोलले असावेत. मात्र, याबाबत आम्ही उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडात अजूनतरी भाजपचा रोल दिसत नसल्याचं ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार स्वखुशीने गेले की, बळजबरीने गेले ते शोधावं लागेल असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. अजित पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांना निधी देत नव्हते त्यामुळे शिवसेना आमदार नाराज झाले आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्यावर मी कधीच कोणत्या आमदाराला कमी निधी दिला नाही, कुणासोबतच भेदभाव केला नसल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Jejuri News: 'जेजुरीत जर भाविकांकडून भंडारा घेण्याची सक्ती केली तर...' पोलिसांनी दिला कडक इशारा

RCB Party: आरसीबीच्या विजयापेक्षा विराट-भुवीच्या 'त्या' जुन्या मैत्रीच्या व्हिडिओने जिंकली मनं!

SCROLL FOR NEXT