NCP Ajit Pawar On Election Commission of India hearing over NCP party symbol and name claim Sharad Pawar  
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा? निवडणूक आयोगातील सुनावणीबद्दल अजित पवार म्हणाले...

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी २ जुलै रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि राज्याच्या राजकारणत खळबळ उडाली. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळले. आता शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्हीकडून पक्षावर दावा सांगितला जात आहे. यादरम्यान निवडूक आयोगासमोर ६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह दोन्हीपैकी कोणत्या गटाला मिळणार आणि पक्ष नेमका कोणाचा? यासाठी निवडणूक आयोगसमोर सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि नावाच्या दाव्यावर भारतीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे, आम्हीही आमची बाजू निवडणूक आयोगासमोर ठेवू." असं अजित पवार म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी खरी कुठली? असं विचारलं असता अजित पवार म्हणाले की ते सांगतील ना, प्रत्येकजण आपआपली भूमिका मांडणार. त्यासंदर्भात ज्यांना बोलवलं आहे ते आपली बाजू कशी उजवी आहे याबद्दल निवडणूक आयोगाला पटवून देतील आणि इलेक्शन कमिशनला तो अधिकार सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ते दोघांचं ऐकून घेतील आणि निर्णय घेतील आणि त्यांनी दिलेला निर्णय दोघांना मान्य करावा लागेल असेही आजित पवार म्हणाले.

दरम्यान शिवसेनेमध्ये झालेल्या लढ्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील चिन्ह आणि पक्षावरुन वाद निर्माण झाला आहे. शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल केलं असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नसून काही लोकांनी वेगळी भूमिका घेतल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. पक्षाचे पदाधिकारी हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचं उत्तरामध्ये म्हटलं आहे.

येत्या ६ ऑक्टोबरला पक्षनाव आणि चिन्ह कोणाला मिळणार याबद्दलची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT