Ajit Pawar on india surpassed china in population growth 
महाराष्ट्र बातम्या

अपत्य देव किंवा अल्लाची कृपा नसते, ती…; लोकसंख्येत चीनला मागं सोडल्यावरून अजित पवार म्हणाले आता बास झालं

रोहित कणसे

भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकलं आहे. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देशाच्या लोकसंख्येवर मिश्कील टिप्पणी केली आहे. अजित पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये सकाळ माध्यमसमूहास दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. (Ajit Pawar statement on Population growth)

अजित पवार देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर बोलताना म्हणाले की, सर्वांनी देशाचं भलं कशात आहे ते पाहिलं पाहिजे. देशातील सगळ्या जनता, राजकीय पक्ष नेत्यांनी, मुख्यमंत्री आणि केंद्रातल्या सर्व वरिष्ठांनी कठोर निर्णय घेतला पाहिजे असे अजित पवार म्हणाले आहेत.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आता खुप झालं, जगात पहिला क्रमांक आला आहे. चायनाला मागं टाकलेलं आहे. आता बास झालं. ३२ ते ३५ कोटी १९४७ साली होतो ते आता २०२३ मध्ये जगात सर्वात जास्त लोकसंख्या निर्माण करणारा देश असा नावलौकिक आपला झाला आहे.

कुठल्याही जात पंथात असं सागितलं नाही की किती अपत्य जन्माला घालावीत. अपत्य परमेश्वर किंवा अल्लाची कृपा नसते, ती नवरा बायकोची कृपा असते, हे कृपा करून सगळ्याने मान्य केलं पाहिजे. आणि अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाकली पाहिजे असे अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मुलीला देखील तेवढाच सन्मान दिला पाहिजे. दोन्ही मुली झाल्या तरी बिघडत नाही, लेकच बापाचं नाव काढते, पोरगं नाही काढत. पोरगं नाव घालवतं. तुम्ही नीट शांतपणे विचार करा असेही अजीत पवार म्हणाले आहेत.

खरंच १९८५ साली पाच कलमी कार्यक्रम खऱ्या अर्थाने राबवला गेला असता तर लोकसंख्या वाढीमुळे अनेक प्रश्नाना सामोरं जावं लागतं ते लागलं नसतं. तरुणांची संख्यातरी किती असावी याचं आत्मपरिक्षण आपण केलं पाहीजे आणि कठोर निर्णय घेतला पाहिजे असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare Health Update : सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

इराणला अमेरिका देणार नुकसान भरपाई, १० कठोर अटी; ट्रम्पना मान्य, युद्धबंदीच्या चर्चेला तयार

'मी ढसाढसा रडतो...' स्वप्नील जोशी खरं सांगताना म्हणाला...'नाच ग घुमा पाहताना मला इतकं...'

Latest Marathi News Live Update: अमरावतीत फुलांचे दर कोसळले! १५० रुपयांचा गुलाब आता फक्त ५० रुपयांत

UP Treasure: पडक्या घराखाली सापडला खजिना’! लाखोंची नाणी उचलून लहान मुलांनी केला पोबारा, थरारक घटनेचा video viral

SCROLL FOR NEXT