Ajit Pawar Jitendra Awhad  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar on Jitendra Awhad: आव्हाड आणि वेदना...न बोललेलं बरं; अजित पवारांचा जितेंद्र आव्हाडांना टोला

कार्तिक पुजारी

मुंबई- शरद पवार आणि अजित पवार गट यांच्यामध्ये निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. पक्ष आणि चिन्ह आपलाच आहे असं म्हणत दोन्ही गटाकडून युक्तीवाद केला जात आहे. अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर करण्यात आलेल्या युक्तीवादामुळे शरद पवार गट नाराज झाला आहे. त्यामुळेच शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन यामुळे वेदना होत असल्याचं वक्तव्य केलं. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, हे एकूण डोळ्यात पाणी आलं. ज्यांनी झाड लावलं मोठं केलं त्यांनाच हे आज भोगावं लागतंय, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं.वेदना आणि आव्हाड कधी जुळतं का? मी न बोललेलं बरं, असं म्हणत त्यांनी टोला लगावला. (ncp ajit pawar on jitendra awhad)

राष्ट्रवादीतून फुटून अजित पवार गट बाहेर पडला आहे. आता या गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा सांगण्यात आला असून यासाठी निवडणूक आयोगासमोर लढाई सुरु आहे. ६ ऑक्टोंबर रोजी झालेल्या सुनावणीत दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. अजित पवार गटाने आमच्याकडे सर्वाधिक ४१ आमदार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे पक्ष आमचाच असल्याचं ते म्हणाले होते.

पुढील सुनावणी ९ तारखेला होणार आहे. या दिवशीही जोरदार युक्तीवाद होण्याची शक्यता आहे. नवाब मलिक हे देखील अजित पवार गटात सामिल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे शरद पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातं. दरम्यान, ज्यांच्यासाठी पवारांनी केलं तेच आता त्यांना घराबाहेर काढत आहे. सुनावणी दरम्यानच्या हुकुमशाह या युक्तीवादाने दु:ख झालं, असं रोहित पवार म्हणाले.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT