Ajit Pawar Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar On Raut : अजित पवारांचा ऑन कॅमेरा थुंकणाऱ्या राऊतांना मोलाचा सल्ला, म्हणाले…

रोहित कणसे

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे कुठल्याना कुठल्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. आता एका पत्रकार परिषदेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारताच राऊत थुंकल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या या कृतीमुळे राऊतांवर राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी संजय राऊतांना मोलाचा सल्ला दिला आहे.

अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात संस्कृती, परंपरा आहे. आपला काही इतिहास आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो आणि काम करू शकतो ते देशाला दाखवून दिलं आहे. मला दुसरी एक बाजू ऐकायला मिळाली की, ते म्हणाले मला काहीतरी त्रास होत होता म्हणून तसं केलं. माझा त्यामागचा हेतू तो नव्हता असंही त्यांनी म्हटलं. पण प्रत्येकानं तारतम्य ठेवून वागावं, असे अजित पवार म्हणाले.

यापूर्वी देखील असाच प्रकार घडला होता

काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आमदार संजय शिरसाट यांचे नाव घेताच संजय राऊत हे वार्ताहराच्या माईकसमोर थुकले होते. त्यानंतर आता शुक्रवारी दुसऱ्यांदा त्यांनी दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारताच पुन्हा तीच कृती केली.

संजय राऊतांचं स्पष्टीकरण

या प्रकारावर विचारले असता राऊतांनी हसून उत्तर दिलं. ते म्हणाले की, थुंकण्यावर बंदी आहे का? सरकारने तसा अध्यादेश काढावा मग. माझ्या जिभेला त्रास झाला, माझ्या घरात मी होतो, माझी जीभ दाताखाली आली म्हणून मी थुंकलो, असं संजय राऊत म्हणाले. कुणाला वाटत असेल त्यांच्या नावाने थुंकलो हा त्यांचा प्रश्न आहे. काही लोकांचे नाव आले आणि जीभ दाताखाली आली, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

SCROLL FOR NEXT