Supriya Sule, Ajit Pawar Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : '...म्हणून सुप्रियाने मला अमिताभ बच्चन म्हटलं', अजित पवारांचा हटके खुलासा

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविषयी बोलतांना खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना 'अमिताभ बच्चन' अशी उपाधी दिली होती. याचसंदर्भाने आज अजित पवारांना प्रश्न विचारण्याता आला. यावर अजित पवारांनी नेहमीप्रमाणे खुमासदार शैलीमध्ये उत्तर दिलेलं आहे.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली होती. यावर सुळे यांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांने मजेदार उत्तर दिले होते. 'अमिताभ बच्चन सर्वच सिनेमात हवे असतात. त्यांच्या आवाज, फोटो, लूक आणि सही सुद्धा चालते. तसेच, अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. त्यामुळे चुकीचं काय आहे.' असं सुळे म्हणाल्या होत्या.

अजित पवारांचं उत्तर

आज पत्रकारांनी अजित पवारांना सुप्रिया सुळे यांच्या विधानाबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, भावाच्या प्रेमापोटी सुप्रियाने मला अमिताभ बच्चन म्हटलं असेल. माझी बहीण आहे. म्हणाली असेल तर तेवढं मनावर घेऊ नका. राजकारणात काम करत असतांना मी कधीही मी 'एँग्री यंग मॅन'चा तोरा दाखवलेला नाही. हो ला हो आणि नाही ला नाही म्हणायचं, ही आपली कामाची पद्धत आहे, असं अजित पवार म्हणाले.

जाहिरातींवरुन सुप्रिया सुळेंचा सरकारला टोला

राज्यात करोडो रुपयांच्या जाहिराती देणारे कोण आहेत, याचा शोध मी आणि अजित पवार घेत आहोत. मात्र अजूनही असा हितचिंतक कोण सापडला नाही. असे हितचिंतक आपल्यालाही मिळाले पाहिजेत आणि पानभर करोडो रुपयांच्या जाहिराती पेपरला मिळाल्या तर आमचेही भले होईल आणि त्यांचेही भले होईल. त्यामुळे अशा लोकांच्या शोधात आहोत, असे हितचिंतक सापडले तर आमचा नंबर त्यांना द्या, असा टोला सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारला लगावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT