NCP Ajit Pawar on tomorrow maharashtra cabinet expansion eknath shinde maharashtra politics  
महाराष्ट्र बातम्या

मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवार म्हणाले; निमंत्रण मिळालं नाही, पण...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्न विरोधकांकडून केला जात होता, त्यानंतर आता उद्या सकाळी 11 वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली आहे. याबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं निमंत्रण अद्याप आलेलं नाही, असे म्हणाले आहेत.

उद्या सकाळी ११ वाजता राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या शक्यतेविषयी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, उद्या कामकाज सल्लाकार समितीची बैठक आहे, त्यासाठी विरोधी पक्षाच्या वतीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींची नावे कळवली आहेत, यावरून उद्या कामकाज समितीची बैठक होणार असल्याचे दिसून येत आहे, असे अजित पवार म्हणाले.

मत्रिमंडळ विस्तारावर बोलताना अजित पवार म्हणाले की, उद्या मंत्रिमंडळ विस्तार असेल तर आम्हाला निमंत्रण दिलं जातं, तसं अजून आलेलं नाहीये. ते उशीरापर्यंत येऊ शकतं. मत्रिमंडळ विस्ताराबद्दल सतत लवकरच असं उत्तर शिंदे-फडणवीसांकडून देण्यात येतं होतं. पण आता मात्र दिल्लीच्या दौऱ्यानंतर आज त्यांची नंदनवनला बैठक झाली, त्यामुळं उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता दाट वाटतेय, अजून अधिकृत कळलेलं नाही, असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांनी मुंबईला बोलवलं आहे, त्यावरून विस्ताराची शक्यता वाटतेय असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT